ये रे, ये रे पावसा़़!
By Admin | Updated: June 16, 2014 01:15 IST2014-06-16T00:39:45+5:302014-06-16T01:15:46+5:30
लातूर : अर्धा जून उलटला तरी अजूनही मान्सूनचे आगमन झाले नाही़ आतापर्यंत केवळ १५ मिलीमीटरच्या आसपास पावसाची नोंद आहे़

ये रे, ये रे पावसा़़!
लातूर : अर्धा जून उलटला तरी अजूनही मान्सूनचे आगमन झाले नाही़ आतापर्यंत केवळ १५ मिलीमीटरच्या आसपास पावसाची नोंद आहे़ त्यामुळे पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी खत-बियाणे खरेदीकडेही पाठ फिरविली आहे़ मागील जवळपास दहा वर्षांची सरासरी लक्षात घेता मान्सूनच्या विलंबामुळे पेरणीचा श्रीगणेशा आता जुलैमध्येच होऊ लागला आहे़
लातूर जिल्ह्याची जून महिन्यातील पावसाची सरासरी १४५ मिलीमीटर इतकी आहे़ परंतु, गेल्या दहा वर्षांत केवळ २००७ चा अपवाद वगळता एकदाही मान्सूनने सरासरीची लक्ष्मणरेषा ओलांडली नाही़ त्यामुळे पेरणीचा हंगाम आता जवळपास जुलै महिन्यातच सुरु होऊ लागला आहे़ यावर्षीचा अर्धा जून उलटला तरी पावसाच्या सरासरीने १५ मिमीचाही आकडा ओलांडला नाही़ गतवर्षी जूनमध्ये १३० मिमी इतका सरासरी पाऊस झाला होता़ २०१२ मध्ये ११६ मिमी, २०११ मध्ये ३४, २०१० मध्ये १०९, २००९ मध्ये ८७, २००८ मध्ये ३३, २००७ मध्ये २७७, २००६ मध्ये १२७ तर २००५ साली जिल्ह्यात सरासरी ६३ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे़ त्यामुळे मागील काही वर्षांत जूनमध्ये पेरण्या सुरु होऊ शकल्या नाहीत़ पावसाच्या अनिश्चिततेमुळे यावेळीही शेतकऱ्यांनी कृषी बाजारपेठेकडे पाठ फिरविली आहे़ सध्या खत-बियाणांसाठी शेतकरी रकमेच्या तडजोडीत गुंतले आहेत़