शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता करावर कोणत्याही प्रकारची व्याज माफी मिळणार नाही! मनपा प्रशासनाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:14 IST

मालमत्ता करावर मनपाकडून २४ टक्के चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करण्यात येते.

छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता करावर कोणत्याही प्रकारची व्याज माफी देण्यात येणार नाही. व्यावसायिक आणि निवासी मालमत्ताधारकांकडून थकबाकी, चालू आर्थिक वर्षाची वसुली करण्यात येणार असल्याची भूमिका बुधवारी महापालिका प्रशासनाने मांडली. मागील तीन वर्षांपासून प्रशासनाने मालमत्ता करावर व्याज माफी देण्याची योजना आणली नाही. व्याज माफी द्यावी, अशी मालमत्ताधारकांची मागणी होती.

शहरात २ लाख ८२ हजारांहून अधिक मालमत्ताधारक आहेत. दरवर्षी ३० ते ३५ टक्केच मालमत्ताधारक नियमित कर भरतात. दरवर्षी कराची थकबाकी वाढतच चालली आहे. यंदा मनपा प्रशासनाने मालमत्ता कर, पाणीपट्टीच्या माध्यमाने ५०० कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. १ लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या. त्यामुळे मालमत्ताधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

४,८८२ जणांना नोटिसामहापालिकेने आतापर्यंत ८ हजार २५३ जणांना नोटिसा पाठविण्याची तयारी केली. त्यातील ४ हजार ८८२ जणांना नोटिसा पाठविण्यात आल्या. उर्वरित नोटिसा या आठवड्यात वितरित केल्या जाणार आहेत. ५३३ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला. त्यांच्याकडून ७ कोटी ५३ लाख रुपये कर भरण्यात आला.

प्रशासकांचे कडक शब्दात आदेशमनपाने लोकअदालतीमार्फत नोटिसा दिल्या. नोटीस घेऊन नागरिक वॉर्ड कार्यालयात जात आहेत. तेथील कर्मचारी त्यांना ‘लोकअदालतीमध्ये जा’ असे सांगून मोकळे होत आहेत. वॉर्ड कार्यालयांनी असे अजिबात करू नये. नागरिकांची तोंडी, लेखी तक्रार असल्यास तेथेच स्वीकारावी. तक्रारीचे जागेवरच निरसन करावे. नागरिकांना लोकअदालतीमध्ये पाठवू नये, अशा शब्दात प्रशासकांनी वॉर्ड कार्यालयांना आदेशित केले.

चेंडू पालकमंत्र्यांच्या कोर्टातमालमत्ता करावर मनपाकडून २४ टक्के चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करण्यात येते. यापूर्वी ७५ टक्के व्याज माफीची योजना मनपाने आणली. यंदाही व्याज माफीची योजना आणावी, अशी आग्रही मागणी शिंदे सेनेने केली आहे. माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, सभागृह नेता राजेंद्र जंजाळ पालकमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. पालकमंत्री अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकर