्रपाठ्यपुस्तकांचे ८४ हजार संच आले

By Admin | Updated: June 6, 2014 01:08 IST2014-06-06T00:13:11+5:302014-06-06T01:08:12+5:30

नांदेड : २०१४ - १५ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून नांदेड शहरातील २६३ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी

There were 84,000 sets of texts | ्रपाठ्यपुस्तकांचे ८४ हजार संच आले

्रपाठ्यपुस्तकांचे ८४ हजार संच आले

नांदेड : २०१४ - १५ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून नांदेड शहरातील २६३ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ८४ हजार ८४५ पुस्तकांचे संच उपलब्ध झाले असून गुरूवारपासून या पुस्तकांचे वाटप शाळास्तरावर सुरू झाले आहे़
शाळेच्या पहिल्या दिवशी १६ जून रोजी ही पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत़ महापालिकेच्या १७ शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिले जाणार आहेत़ तसेच शहरातील खाजगी अनुदानित शाळा, जिल्हा परिषदेच्या ३४ शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप होणार आहे़ पहिली ते आठवीपर्यंतच्या मराठी माध्यमासाठी ५५ हजार ४०४ पुस्तकांचे संच, उर्दू माध्यमासाठी २७ हजार ३६, हिंदी माध्यमासाठी १ हजार ७६४ व इंग्रजी माध्यमासाठी ६४१ पुस्तकांचे संच आले आहेत़ शहरातील खाजगी अनुदानीत, जिल्हा परिषद व महापालिका शाळेत इयत्ता पहिलीत ११ हजार ३४९, दुसरीत १० हजार ६००, तिसरीत १० हजार १३९, चौथीत ९ हजार ६५७, पाचवीत ११ हजार २४८, सहावी १० हजार ५९८, सातवीत १० हजार ६२६, आठवीत १० हजार ६२८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ इयत्ता पहिली- मराठी माध्यमासाठी ६ हजार ८०७, उर्दूसाठी ४ हजार ३१८, हिंदी २२४, इयत्ता दुसरी - मराठी माध्यमासाठी ६ हजार ४७७, उर्दू ३ हजार ८९४, हिंदी २२९, तीसरी- मराठी माध्यमासाठी ६ हजार १९५, उर्दू ३ हजार ७२३, हिंदी २२१, चौथी - मराठी माध्यम ६ हजार २४५, उर्दू ३ हजार २१८, हिंदी १९४, पाचवी- मराठी माध्यम ७ हजार ५८५, उर्दू ३ हजार ३१०, हिंदी २३०, इंग्रजी १२३, सहावी - मराठी माध्यम ७ हजार २६१, उर्दु ३ हजार ५, हिंदी २३०, इंग्रजी १०२, सातवी - मराठी माध्यम ७ हजार ३५०, उर्र्दू २ हजार ९४५, हिंदी २२६, इंग्रजी १०५, आठवी - ७ हजार ४८४, उर्दु २ हजार ६२३, हिंदी २१०, इंग्रजी ३११ असा एकूण ८४ हजार ८४५ पाठ्यपुस्तकांचे संच आले असून खय्युम प्लॉट येथील मनपा शाळा तसेच विष्णूनगर येथील शाळेतून या पुस्तकांचे वाटप होत आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: There were 84,000 sets of texts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.