चोरी करून पळताना चोरटा पडला विहिरीत

By Admin | Updated: January 20, 2015 01:27 IST2015-01-20T01:13:33+5:302015-01-20T01:27:33+5:30

वैजापूर : शहरालगत असलेल्या इंगळे वस्तीवर डल्ला मारून पळ काढताना एक चोरटा विहिरीत पडल्याने तो भामटा अलगद हाती लागला. पोलिसांनी या त्याला अटक केली आहे.

There was a sneaky thief in the well in the well to flee | चोरी करून पळताना चोरटा पडला विहिरीत

चोरी करून पळताना चोरटा पडला विहिरीत


वैजापूर : शहरालगत असलेल्या इंगळे वस्तीवर डल्ला मारून पळ काढताना एक चोरटा विहिरीत पडल्याने तो भामटा अलगद हाती लागला. पोलिसांनी या त्याला अटक केली आहे. सन्मान शिवराम चव्हाण (रा. लक्ष्मीनगर, कोपरगाव) असे पकडलेल्या चोराचे नाव आहे. त्याचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेत फरार झाला.
इंगळे वस्ती येथे रविवारी मध्यरात्री दोन सराईत चोरट्यांनी रखमाजी शंकर इंगळे यांच्या शेतवस्तीवरील घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी इंगळे कुटुंब गाढ झोपेत होते. चोरांनी कपाटातून रोख १ हजार रुपये काढले खरे; परंतु घरात कुणी तरी घुसल्याची चाहूल लागताच घरातील लहान मुलांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केल्याने घरातील माणसे खडबडून जागी झाली व आवाज ऐकल्याने चोरटे पकडण्याच्या भीतीने पळून जात असताना चोरट्यांना पळताना विहीर दिसली नाही. त्यामुळे एक चोर विहिरीतत पडला. त्यामुळे परिसरातील नागरिक जमा झाले.
या घटनेची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन, रवींद्र काळे व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन विहिरीत पडलेल्या चोराला बाहेर काढले. त्याच्या अंगझडतीत चोरी केलेले एक हजार रुपये आढळून आले. या प्रकरणी रखमाजी इंगळे यांच्या फिर्यादीवरून सन्मान चव्हाण याच्या विरुद्ध वैजापूर ठाण्यात गुन्हा दाखल असून, दरम्यान, फरार असलेल्या दुसऱ्या चोरट्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

Web Title: There was a sneaky thief in the well in the well to flee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.