सेलू तालुक्यातील प्रश्न पडले रेंगाळत
By Admin | Updated: June 6, 2014 01:02 IST2014-06-06T00:16:45+5:302014-06-06T01:02:23+5:30
सेलू : तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील जनहिताची कामे अधिकार्यांच्या उदासिनतेमुळे रखडत पडली आहेत़

सेलू तालुक्यातील प्रश्न पडले रेंगाळत
सेलू : तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील जनहिताची कामे अधिकार्यांच्या उदासिनतेमुळे रखडत पडली आहेत़ त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे़ याबाबत युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष रवी डासाळकर यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देवून कामे मार्गी लावण्याची मागणी केली आहे़
पंचायत समितीकडून एम़आऱई़जी़एस़ अंतर्गत वैयक्तिक विहिरीवर शौचालयाची कामे करूनही लाभार्थ्यांची देयके रखडली आहेत़ तसेच ई मस्टर कामासाठी कर्मचार्यांची अपुरी संख्या असल्यामुळे विविध अडचणी येत आहेत़ एम़आऱ ई़जी़ एस़ अंतर्गत सहा महिन्या पासून प्रस्तावित असलेले नवीन शेत रस्ते, पांदण रस्ते व जलसंधारणच्या पाझर तलाव, सी़ सी़ बंधारे, गावतलाव या कामांना मान्यता देण्यात यावी़ या कामामुळे सिंचनाचे व पिण्याच्या पाण्याची सोय होईल़ तालुक्यात मोठया प्रमाणावर गारपीट झाली आहे़ त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या स्थितीत पीककर्ज शेतकर्यांना वाटप करणे आवश्यक आहे़ कर्जासाठी लागणारी कागदपत्रे लवकर उपलब्ध शेतकर्यांना होत नाहीत़ परिणामी शेतकर्यांची कुंचबना होते़
तलाठी व मंडळ अधिकार्यांकडून फेर करण्यास विलंब करण्यात येत आहे़ तसेच गारपीटीच्या अनुदाना पासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत या शेतकर्यांनाही अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे़ तालुक्यातील शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे़ पेरणीसाठी लागणारे बी बियाणे, रासायनिक खते उपलब्ध करावे तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडून शेतकर्यांना अनुदान तत्वावर साहित्य वाटप करावे रखडलेली शेतीपंप जोडणीची कामे व विद्युत रोहित्र पावसाळयापुर्वी वीज वितरण कंपनीने करणे आवश्यक झाले आहे़ ग्रामीण भागात घरगुती वीज जोडणी देतांनाही विलंब होत आहे़ शासकीय कार्यालयातील अनेक कामे विलंबाने होत असल्यामुळे शेतकर्यांसह सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे त्यामुळे ही कामे तातडीने मार्गी लावणे आवश्यक झाले आहे़ (प्रतिनिधी)
उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोय
येथील उपजिल्हा रूग्णालयात तज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत़ तसेच महागडी मशिनरी असतांनाही तज्ञ नसल्यामुळे ही मशीनरी धूळ खात पडून आहे़ त्यामुळे रूग्णांना याचा लाभ होत नाही़ एक्स रे यंत्र बंद पडले आहे़
रूग्णालय परिसरात स्वच्छता करण्याची मागणी युवक काँग्रेसचे जिंतूर विधानसभा अध्यक्ष रवि डासाळकर तसेच आ़ रामप्रसाद बोर्डीकर मित्र मंडळाचे रामप्रसाद पौळ, राजेभाऊ भुजबळ, संदीप बोकन, अशोक सेलवाडीकर, अनिल पवार, मिलिंद पवार, गणेश सवणे, कपिल फ ुलारी, गजानन पवार, नितिन आजबे, शिवहारी शेवाळे, किशोर कारके, सुंदर बरसाले आदींनी केली आहे़