मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे

By Admin | Updated: March 29, 2016 00:53 IST2016-03-29T00:13:02+5:302016-03-29T00:53:32+5:30

नजीर शेख , औरंगाबाद मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे, यासाठी मोठा संघर्ष झालेला आहे. १०६ जणांनी हौतात्म्य पत्करलेले आहे. राज्य एकसंध राहावे; शिवाय बेळगाव

There should be only one state of the Marathi linguists | मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे

मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे


नजीर शेख , औरंगाबाद
मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे, यासाठी मोठा संघर्ष झालेला आहे. १०६ जणांनी हौतात्म्य पत्करलेले आहे. राज्य एकसंध राहावे; शिवाय बेळगाव, बीदर, भालकीचा भाग महाराष्ट्रात सामील होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बीदर, कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव येथील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
राज्यात सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या स्वतंत्र राज्याची भूमिका पुढे आली आहे. त्यावरून विदर्भात आंदोलनही सुरू झाले आहे. मराठवाड्यात काही कार्यकर्ते वगळता नेत्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात त्याची चर्चा नाही; परंतु नागरिकांमध्ये मराठवाड्याला विकास प्रक्रियेत डावलले गेल्याची भावना आहे. दुसऱ्या बाजूला बेळगाव, निपाणी, बीदर, भालकीसह महाराष्ट्र राज्य असायला हवे, या मागणीसाठी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते गेली ५६ वर्षे लढा देत आहेत. स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाडा राज्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर (पान २ वर)
अखंड महाराष्ट्रातच आमचे हित आहे. महाराष्ट्राचे तुकडे पडणार असतील तर आम्हाला कुणाचा आधार राहणार. त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे पडू नयेत असेच वाटते. राज्यातील विद्यमान सरकार राज्याचे तुकडे पाडणार असेल तर आम्ही महाराष्ट्र सरकारकडे कोणत्या तोंडाने पाहावे. गेल्या ५० ते ५५ वर्षांचा आमचा लढा वाया जाणार नाही, हेदेखील महाराष्ट्रातील नेत्यांना पाहावे लागणार आहे. राज्याचे तुकडे झाल्यास उद्या कर्नाटकातील लोकही आमच्या मागण्यांची दखल घेणार नाहीत.
आमदार संभाजी पाटील, महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव

Web Title: There should be only one state of the Marathi linguists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.