मुहूर्त काढून उपयोग नाही, सत्तेचे स्वप्न पाहू नका
By | Updated: November 28, 2020 04:16 IST2020-11-28T04:16:35+5:302020-11-28T04:16:35+5:30
सोयगाव : सत्तेसाठी कितीही मुहूर्त काढले तरी सत्तेच्या सारीपटावर पाच वर्षे महाआघाडीचेच सरकार राहील. त्यामुळे सत्तेची स्वप्ने पाहू नका, ...

मुहूर्त काढून उपयोग नाही, सत्तेचे स्वप्न पाहू नका
सोयगाव : सत्तेसाठी कितीही मुहूर्त काढले तरी सत्तेच्या सारीपटावर पाच वर्षे महाआघाडीचेच सरकार राहील. त्यामुळे सत्तेची स्वप्ने पाहू नका, असा टोला शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी भाजपला लगावला. सोयगावात आयोजित शिवसेनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
आगामी नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय तयारी करण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी घोसाळकर बोलत होते. नगरपंचायत व ग्रामपंचायतींमध्ये यश मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपासूनच कामाला लागावे, असे आवाहनही घोसाळकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, अब्दुल समीर, रघुनाथ चव्हाण, तालुका प्रमुख प्रभाकर काळे, अंकुश रंधे, जि.प. सदस्य गोपीचंद जाधव, किशोर अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल, सुधाकर पाटील, दिलीप मचे, डॉ. अस्मिता पाटील आदींची उपस्थिती होती.
छायाचित्र ओळ : सोयगावला आढावा मेळाव्यात बोलताना शिवसेना संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, व्यासपीठावर आ. डॉ. अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, प्रभाकर काळे, डॉ. अस्मिता पाटील आदी.