शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

हाती अजून काहीच पडेना; ऑनलाईनच्या अटीमुळे ३० टक्के शेतकरी मदतीपासून राहिले वंचित!

By विकास राऊत | Updated: April 13, 2023 18:11 IST

८ महिन्यांत तीनवेळा शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज

छत्रपती संभाजीनगर : ऑगस्ट २०२२ ते ११ एप्रिल २०२३ या ८ महिन्यांच्या काळात शेतकऱ्यांना अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी तीनवेळा मदतीची घोषणा व तरतूद शासनाने केली. मात्र ऑनलाईनच्या कचाट्यात ही मदत अडकली असून, पुढे अफाट आणि मागे सपाट असा काही प्रकार सध्या सुरू असल्याचे दिसते आहे. मदतीच्या घोषणांचा बहर एकीकडे येत आहे, तर दुसरीकडे ऑनलाइन मदत वाटप करण्याच्या निर्णयामुळे सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांपर्यंत अद्याप अतिवृष्टीची मदतही पोहोचलेली नाही.

सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे १७०० कोटी आणि मार्च-एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाची ८४ कोटींची मदत शेतकऱ्यांना केव्हा मिळणार? असा प्रश्न आहे. अजूनही अवकाळी पावसाचे संकट सुरूच असून, नुकसानीचे आकडे वाढत आहेत.

पहिली घोषणा आणि वाटप असेमराठवाड्यात २०२२ मधील खरीप हंगामाला अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा फटका बसला. ४८ लाख हेक्टरपैकी ३२ लाख २३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.जून ते ऑक्टोबर २०२२ मध्ये नुकसानीचे पंचनामे करून ४ हजार ४८० कोटी रुपयांची नुकसान भरपाई शासनाकडे मागितली. त्यापैकी शासनाने अतिवृष्टीचे १००८ कोटी ३० लाख ८१ हजार, सततच्या पावसाचे ५९७ कोटी ५४ लाख आणि शंखी गोगलगाईंचे ९८ कोटी ५ लाख ८० हजार असे एकूण १ हजार ७०४ कोटी ३५ लाख ६१ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली.

दुसऱ्यांदा ऑनलाईनची आडकाठी आणलीसप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मधील अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे २ हजार ७७६ कोटी ५१ हजार ४५ हजार रुपयांपैकी अतिवृष्टीचे १२१४ कोटी रुपये शासनाने १७ नोव्हेंबर २०२२ रोजी मंजूर केले. ही मदत तातडीने मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटले, मात्र शासनाने मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन वर्ग करण्याचा निर्णय घेतला.

ऑनलाईनच्या कचाट्यात अशी अडकली मदतजानेवारी २०२३ मध्ये माहिती संकलित केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे वाटले; मात्र ६ फेब्रुवारी रोजी शासनाने नव्याने पत्र पाठवून मदत वर्ग करण्याची सुधारित ऑनलाईन प्रक्रिया नमूद केली. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ च्या प्रोत्साहन लाभ योजनेच्या धर्तीवर ऑनलाईन प्रणाली महा-आयटी कंपनीमार्फत राबविण्याचा निर्णय झाला. तहसीलदार ते निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा तहसीलदारांच्या लॉगीनमध्ये यादी डाऊनलोड करण्याच्या प्रक्रियेत मदत वाटप रखडली.

मार्च-एप्रिलमधील नुकसानीचे ऑनलाईन वाटप...छत्रपती संभाजीनगर २२ कोटी १७ लाख, जालन्यात ३ कोटी ६७ लाख, परभणीत ४ कोटी ३७ लाख, हिंगोलीत ६ कोटी ४ लाख, नांदेडमध्ये ३० कोटी ५२ लाख, बीडमध्ये ५ कोटी ९९ लाख, लातूर जिल्ह्यात १० कोटी ५६ लाख, तर धाराशिवमध्ये १ कोटी ३९ लाख असे ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपयांच्या नुकसान भरपाईला शासनाला मंजुरी दिली, त्यालाही ऑनलाईनचे निकष आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद