टँकर खेपांमध्ये अनियमितता होत असल्याने तंटे

By Admin | Updated: March 28, 2016 00:18 IST2016-03-27T23:48:36+5:302016-03-28T00:18:52+5:30

गौतम पारवे , केज तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. आजघडीला ७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. खेपांमध्ये अनियमितता होत असल्याने गावागावांमध्ये तंटे वाढले आहेत.

There is irregularities in the tanker tranche | टँकर खेपांमध्ये अनियमितता होत असल्याने तंटे

टँकर खेपांमध्ये अनियमितता होत असल्याने तंटे


गौतम पारवे , केज
तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. आजघडीला ७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. खेपांमध्ये अनियमितता होत असल्याने गावागावांमध्ये तंटे वाढले आहेत.
तालुक्यातील धनेगावचे मांजरा धरण आटल्यामुळे केज शहर व संपूर्ण तालुक्यात पाण्याचा वणवा पेटला असून थेंबभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ जनतेवर आली आहे. शासकीय यंञणेद्वारे होत असलेला टँकर पाणीपुरवाठा कमी पडत असून टँकरच्या खेपांमध्ये अनियमितता होत असल्याच्या तक्रारी जनतेमधून येत आहेत.गावात पाण्याचे टँकर आले की पाणी भरण्यासाठी गोंधळ व भांडणे होण्याच्या घटना वाढल्या आहेत. परिणामी पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी स्थलांतर करण्याची वेळ जनतेवर येऊन ठेपली आहे.
केज पंचायत समिती मार्फत ०१ मार्च अखेरपर्यंत केज तालुक्यात ०२ शासकीय व ७२ खाजगी अशा एकूण ७४ टँकरद्वारे ५३ गावांमध्ये व ५३ वाड्यांवस्त्यांवर पाणीपुरवठा सुरु आहे.
याबरोबरच पंचायत समिती प्रशासनाने केज तालुक्यात २० विहिरी व १७३ बोअर अधिग्रहित केल्याची माहिती दिली आहे. परंतु मार्च महिन्यामध्येच उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या घरात जाऊ लागल्यामुळे अधिग्रहित केलेल्या जलस्ञोतांतील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. यामुळे पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे.

Web Title: There is irregularities in the tanker tranche

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.