माजलगाव शहरात दोन गट भिडले

By Admin | Updated: May 15, 2014 00:04 IST2014-05-14T22:54:46+5:302014-05-15T00:04:04+5:30

माजलगाव: किरकोळ कारणावरुन दोन गटात तुंबळ मारामार्‍या झाल्याची घटना भीमनगरात मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घडली़

There are two groups in Majalgaon | माजलगाव शहरात दोन गट भिडले

माजलगाव शहरात दोन गट भिडले

माजलगाव: किरकोळ कारणावरुन दोन गटात तुंबळ मारामार्‍या झाल्याची घटना भीमनगरात मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घडली़ या प्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात १३ जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ माजलगाव शहरातील भीमनगर भागात आकाश भगवान पौळ यांना बेदम मारहाण केली़ पौळ यांच्या फिर्यादीवरुन अक्षय मेंडके, अजय मेंडके, संतोष मेंडके, बाबा मेंडके, कपिल मेंडके, भागवत मेंडके यांच्या विरोधात माजलगाव शहर ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला़ दरम्यान, घरातून बोलावून मोटार सायकलवर बसवून विमानतळ येथे नेऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्या प्रकरणी अक्षय मेंडके यांनी सहा जणांविरुद्ध फिर्याद दिली़ आकाश सावंत, आकाश पौळ, राजपाल जावळे, विलास कांबळे, अमोल पौळ, बबलू प्रधान यांचा आरोपींत समावेश आहे़ तपास उपअधीक्षक ज्योती क्षीरसागर करीत आहेत़ (वार्ताहर) तणावपूर्ण स्थिती माजलगाव शहरात दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर भीमनगर भागात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. शहरातील परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे उपअधीक्षक ज्योती क्षीरसागर यांनी सांगितले.

Web Title: There are two groups in Majalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.