आष्टी येथे चोरीचे सत्र सुरूच; बिअरबार फोडले
By Admin | Updated: August 1, 2014 00:30 IST2014-08-01T00:18:02+5:302014-08-01T00:30:09+5:30
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे दि. २९ जुलै रोजी मध्यरात्री आष्टी मोंढा टी पॉर्इंट येथील नंदनी बियर बारचा मागील दरवाजा फोडून आत प्रवेश करून आतील देशी, विदेशी दारूचे बॉक्स चोरट्यांनी चोरून नेले.

आष्टी येथे चोरीचे सत्र सुरूच; बिअरबार फोडले
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे दि. २९ जुलै रोजी मध्यरात्री आष्टी मोंढा टी पॉर्इंट येथील नंदनी बियर बारचा मागील दरवाजा फोडून आत प्रवेश करून आतील देशी, विदेशी दारूचे बॉक्स चोरट्यांनी चोरून नेले. तसेच गल्ल्यातील ७ हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली.
आष्टी येथील नंदनी बियर बारचे मालक सकाळी ९ वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता मागील बाजूस बारचा दरवाजा उघडलेला दिसून आला.
तसेच चोरट्यांनी तिथे दारू पिल्याचे दिसून आले. या घटनेची फिर्याद बार मालक परमेश्वर गोविंदअप्पा सातपुते यांनी दिली. दरम्यान, आष्टी येथील मागील आठवड्यात बसस्थानकाजवळील तीन दुकाना चोरट्यांनी फोडल्या होत्या. याची गंभीर दखल घेवून जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनी सहायक पोलिस निरीक्षक धनराज गव्हाणे यांची तडकाफडकी बदली केली होती.
आष्टी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक यांनी वरील चोरीबाबत तत्परता दाखवून श्वानपथक व ठसे पथकास पाचारण केले आहे. परंतु सदरील श्वान पथक पाथरी रोडकडे माग दाखवला.
चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी एक प्रकारे पोलिसांना आव्हान दिले आहे. घटनेचा तपास सपोनि गुड्डावार करत असून, चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
टेंभूर्णीत चोरट्यांचा धुमाकूळ
जाफराबाद तालुक्यातील टेभूर्णी येथे बुधवारी चोरट्यांनी धुमाकूळ घालून दोन घरे फोडली. दोन्ही ठिकाणच्या चोरीत चोरट्यांनी लाखाचा ऐवज लंपास केला. येथील संजय नवनाथ सुद्रीक हे ३० जुलै रोजी सकाळी आपल्या घराला कुलूप लावून शेतात गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्याच्या घराचे कुलूप तोडून ८५ हजाराचे सोन्याचांदीचे दागिने व रोख ९ हजार रूपये असा ऐवज चोरून नेला.
ही चोरी भरदिवसा झाली. तसेच त्याच दिवशी रात्री महंमद सालेह चाऊस हे आपल्या घरात झापलेले असताना अज्ञात चोरट्यांनी मागील दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील २० हजार रूपये किमतेचे दागिने लंपास केले.
या दोन्ही चोरीने गावात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि बी. आर. निभारे हे करीत आहे. दरम्यान गावात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी सरपंच विष्णू जमधडे, उपसरपंच राजू खोत यांनी केली.