एकाच घरी तीनदा चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:47 IST2017-11-12T23:47:23+5:302017-11-12T23:47:30+5:30
एकदा नव्हे तर तिस-यांदा एकाच घरी चोरी करून चोरट्यांनी २५ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले

एकाच घरी तीनदा चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : एकदा नव्हे तर तिस-यांदा एकाच घरी चोरी करून चोरट्यांनी २५ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना कडा शहरात चाळीस बंगला ठिकाणी शनिवारी मध्यरात्री डॉ.उमेश गांधी यांच्या घरी घडली. घटनास्थळी विविध पथके व अपर पोलीस अधीक्षकांनी भेट देऊन पाहणी केली.
आष्टी तालुक्यातील कडा येथील चाळीस बंगला या ठिकाणी डॉ. उमेश गांधी यांचे घर आहे. या अगोदर दोन वेळा याच घरी चोरीच्या घटना घडल्या आहेत. आताही शनिवारी मध्यरात्री याच घरी चोरी झाली. तिस-यांदा चोरीचा प्रकार घडला असल्याने कुटुंब भयभीत झाले आहे. यापूर्वीच्या एकाही चोरीचा तपास पोलिसांना लागलेला नाही. शहरासह तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढले आहे. गांधी कुटुंब झोपेत असताना शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील दरवाजा उघडून कपाटातील २५ तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी भेट देऊन पाहणी केली.