घाटनांद्रा येथे कृषी केंद्रात अडीच लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:06 IST2021-02-05T04:06:31+5:302021-02-05T04:06:31+5:30

घाटनांद्रा : घाटनांद्रा बसस्थानक परिसरात असलेल्या आदिनाथ कृषी सेवा केंद्रात अज्ञात चोरांनी शुक्रवारी मध्यरात्री डल्ला मारून अडीच लाख ...

Theft of Rs 2.5 lakh from an agricultural center at Ghatnandra | घाटनांद्रा येथे कृषी केंद्रात अडीच लाखांची चोरी

घाटनांद्रा येथे कृषी केंद्रात अडीच लाखांची चोरी

घाटनांद्रा : घाटनांद्रा बसस्थानक परिसरात असलेल्या आदिनाथ कृषी सेवा केंद्रात अज्ञात चोरांनी शुक्रवारी मध्यरात्री डल्ला मारून अडीच लाख रुपयांच्या कृषी साहित्यांची चोरी केली आहे. या प्रकरणी केंद्रचालक राहुल पाटणी यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली.

घाटनांद्रा येथील बसस्थानक परिसरात आदिनाथ कृषी सेवा केंद्र आहे. शुक्रवारी (दि. २९) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. महागड्या औषधींचे साहित्य व रोख रक्कम, असे अंदाजे अडीच लाखांचे कृषी साहित्य चोरून नेले. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. केंद्रचालक राहुल पाटणी यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस अधिकारी राहुल नेहुल यांनी घटनास्थळाला भेट दिली. पंचनामा करीत श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास आडे, जमादार रंगराव बावस्कर हे करीत आहेत.

-----------

फोटो : घाटनांद्रा बसस्थानक परिसरात असलेल्या कृषी सेवा केंद्राचा पंचनामा करताना पोलीस.

Web Title: Theft of Rs 2.5 lakh from an agricultural center at Ghatnandra