‘केपू’ची चोरी; ४ ट्रक पकडले
By Admin | Updated: June 19, 2016 23:21 IST2016-06-19T23:18:42+5:302016-06-19T23:21:06+5:30
सेनगाव : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून शासनाचा महसूल बुडवत रात्रंदिवस (केपू) वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.

‘केपू’ची चोरी; ४ ट्रक पकडले
सेनगाव : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून शासनाचा महसूल बुडवत रात्रंदिवस (केपू) वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मधरात्री कारवाई करीत सालेगाव शिवारात केपूची चोरटी वाहतूक करणारे चार ट्रक पकडले.
सेनगाव तालुक्यातील सालेगाव, बरडा, वझर, उटीपूर्णा आदी ठिकाणावरून पूर्णा नदीपात्रांतील केपू वाळूची मोठी तस्करी होत आहे. शासनाचा महसूल बुडवत या भागात बोगस पावत्यांच्या आधारे केपू वाळूचा गोरखधंदा सुरू झाला आहे.
विशेष म्हणजे, केपू वाळू चोरी विरोधात धडक कारवाई करण्याऐवजी प्रशासन हतबलतेची भूमिका व्यक्त करीत असल्याने शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एम.डी. थोरात यांच्यासह जमादार वाठोरे, फुलाजी सावळे, विक्रम कुंदनानी, नानाराव पोले यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चारही ट्रक ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी सेनगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत.
सदरच्या प्रकरणात सेनगाव तहसील कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती फौजदार राजू मोरे यांनी दिली. (वार्ताहर)