लोहगाव येथे रोख रकमेसह दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:04 IST2021-05-06T04:04:27+5:302021-05-06T04:04:27+5:30

बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी लोहगाव येथील खंडोबा वस्तीवर राहणारे गणेश अशोक इथापे यांच्या घरात जिन्यातून प्रवेश केला. या दरम्यान ...

Theft of jewelery along with cash at Lohgaon | लोहगाव येथे रोख रकमेसह दागिन्यांची चोरी

लोहगाव येथे रोख रकमेसह दागिन्यांची चोरी

बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी लोहगाव येथील खंडोबा वस्तीवर राहणारे गणेश अशोक इथापे यांच्या घरात जिन्यातून प्रवेश केला. या दरम्यान गणेश ईथापे व परिवारातील सदस्य गच्चीवर झोपलेले होते. घरात कुणीही नसल्याने चोरट्याने घरातील कपाटाचा दरवाजा तोडून कपाटातील रोख एक लाख रुपये, नेकलेस, गंठण, झुंबर, मनी मंगळसूत्र, एकदाणी, अंगठी, आदी सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. घटनेची खबर पोलीस पाटील किरण वाघ यांनी बिडकीन पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने, फौजदार जगदीश मोरे, यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पुढील तपास फौजदार मोरे, बिट जमादार गोविंद राऊत हे करीत आहेत.

चौकट

बैलजोडीसाठी आणले होते पैसे

खरीप हंगामाची मशागत करण्यासाठी गणेश ईथापे यांना बैलजोडी खरेदी करायची होती. यासाठी त्यांनी दोन दिवसांपूर्वी बँकेतून एक लाख रुपये काढून आणले होते. मात्र, दुर्दैवाने या रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. आता मशागतीसाठी बैलजोडी कशी खरेदी करावी असा प्रश्न शेतकरी गणेश ईथापे यांच्यासमोर उभा राहिला आहे.

Web Title: Theft of jewelery along with cash at Lohgaon