ब्युटीपार्लरमध्ये चोरीचा प्रयत्न; तिघी ताब्यात
By Admin | Updated: August 17, 2015 01:03 IST2015-08-17T00:55:44+5:302015-08-17T01:03:53+5:30
उस्मानाबाद: ब्युटीपार्लरमध्ये गेल्यानंतर कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन महिलांविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ब्युटीपार्लरमध्ये चोरीचा प्रयत्न; तिघी ताब्यात
उस्मानाबाद: ब्युटीपार्लरमध्ये गेल्यानंतर कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन महिलांविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना रविवारी दुपारी शहरातील पोष्ट आॅफिस परिसरात घडली़
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद शहरातील पोष्ट आॅफिसजवळ पल्लवी घोडके यांचे ब्युटीपार्लर आहे़ नेहमीप्रमाणे पल्लवी घोडके या रविवारी दुपारी काम करीत असताना मिना शिंदे, सुनंदा शिंदे, सुषमा पवार (सर्व राक़सई) या तीन महिला थ्रीडींग करण्यासाठी ब्युटीपार्लरमध्ये आल्या होत्या़ घोडके या कामात असताना दुकानात आलेल्या त्या तीन महिलांनी कपाटातील चांदीची भांडी, सोन्याचे दागिने चोरी करण्याचा प्रयत्न वरील तीन महिलांनी केल्याची फिर्याद पल्लवी घोडके यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली़ घोडके यांच्या फिर्यादीवरून वरील तीन महिलांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिन्ही महिलांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोना गणापुरे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)