शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा चोरी; दूकाने फोडणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 16:26 IST

दोन्ही आरोपींकडून ६ दुचाकीसुद्धा जप्त करण्यात आल्या 

ठळक मुद्देआरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्ड वरील चोरटे आहेत. दुकानफोडी आणि वाहनचोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

औरंगाबाद: बीड बायपासवरील नोबल फार्मा हे औषधी दुकान आणि विश्रांतीचौकातील किराणा दुकान, दारू दुकान फोडणाऱ्या दोन चोरट्यांना पुंडलिकनगर पोलिसांनी घटनेनंतर २४ तासांत अटक केली. यावेळी चोरट्यांकडून चोरीच्या ६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

आकाश भीमराव शिंदे ( १९, रा.  गौतमनगर , आंबेडकरनगर) आणि गजानन सुभाष मकळे (२०, रा.मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसर) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. प्राप्त माहिती अशी की, विश्रांतीनगर येथील हिम्मत पटेल यांचे किराणा दुकान चोरट्यानी तीन वेळा फोडून माल पळविला होता. याविषयी त्यांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविली होती. या गुंह्याचा तपास सुरू असतांना विश्रांतीनगर येथील दारू दुकान आणि बायपास वरील नोबल फार्मा हे औषधी दुकानाचे शटर उचकटुन चोरट्यांनी रोख ६ हजार रुपये चोरून नेले. 

या घटनेने पोलिसांत खळबळ उडाली आणि चोरांचा कसून शोध सुरू केला. तेव्हा सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, फौजदार प्रभाकर सोनवणे, हवालदार रमेश सांगळे ,दादाराव पवार, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रवीण मुळे, राजेश यदमळ , रवी जाधव , दिपक जाधव यांच्या पथकाने दोन्ही संशयित आरोपींना मुकुंदवाडी परिसरातून  ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी दुकाने फोडल्याची आणि विविध ठिकाणाहून सहा मोटारसायकली चोरल्याची  गुंह्याची कबुली त्यांनी दिली. चोरलेल्या सहा मोटारसायकल पोलिसांच्या हवाली केल्या. 

आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्ड वरील चोरटे आहेत. पोलिसांनी अटक केल्यानंतर जामीनावर सुटल्यावर ते पुन्हा गुन्हा करतात अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली. आरोपींकडुन शहराच्या वेगवेगळ्या दुकानफोडी आणि वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसtheftचोरी