दुकानातून २० हजारांची रोकड लांविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:41 IST2019-07-08T23:41:22+5:302019-07-08T23:41:33+5:30

वाळूजला रामराई चौफुलीलगत एका दुकानाचे शटर उचकटुन चोरट्यांनी २० हजार रुपये लांबविल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले.

theft 20 thousand rupees cash from the shop | दुकानातून २० हजारांची रोकड लांविली

दुकानातून २० हजारांची रोकड लांविली

वाळूज महानगर: वाळूजला रामराई चौफुलीलगत एका दुकानाचे शटर उचकटुन चोरट्यांनी २० हजार रुपये लांबविल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.


फिरोज महेबूब शेख यांचे रामराई चौफुलीवर गोळ्या-बिस्कीट व पान मसाले विक्रीचे दुकान आहे. रविवारी रात्री शेख फिरोज हे दुकान बंद करुन घरी गेले. सोमवारी सकाळी या दुकानाचे शटर उचकटलेले नागरिकांच्या लक्षात आले. याची माहिती दुकान मालक शेख फिरोज यांना दिली.

फिरोज यांनी जाऊन पाहणी केली असता दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे व ड्रॉवरमधील जवळपास २० हजारांची रोकड गायब असल्याचे लक्षात आले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयात रात्री १ वाजेच्या सुमारास शेख फिरोज यांच्या दुकानात चोरी करताना तीन चोरटे कैद झाले आहेत. याच ठिकाणी एक पांढºया रंगाची कारही दिसून आल्यामुळे चोरटे या कारमधून आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून या तिघा चोरट्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Web Title: theft 20 thousand rupees cash from the shop