शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

जिजाऊ उद्यान, सावरकर उद्यान व अथर्व वाटिका सोसायटीत रंगमंच!

By admin | Updated: July 23, 2014 00:41 IST

औरंगाबाद : वॉर्ड क. ८४ मध्ये तीन खुल्या रंगमंचांचा लोकार्पण सोहळा औरंगाबाद पूर्वचे आमदार व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला.

औरंगाबाद : वॉर्ड क. ८४ मध्ये तीन खुल्या रंगमंचांचा लोकार्पण सोहळा औरंगाबाद पूर्वचे आमदार व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी या वॉर्डाचे नगरसेवक पंकज भारसाखळे व शेकडो नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कल्पतरू सोसायटीतील आदर्श कॉलनीत राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान, याच सोसायटीतील नाथ प्रांगणातील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात व अथर्व वाटिका सोसायटीत हे खुले रंगमंच साकारले गेले. आता यापुढे या भागातील नागरिक सगळे सण, छोटे- मोठे कार्यक्रम उत्साहात या रंगमंचावर साजरे करू शकतील. हे रंगमंच साकारल्याबद्दल राजेंद्र दर्डा यांना या भागातील नागरिकांनी मनोमन धन्यवाद दिले. पंकज फुलपगर, दामूअण्णा शिंदे, बबन डिडोरे पाटील, राजाराम मोरे, राहुल चव्हाण यांच्यासह आदर्श कॉलनीतील रंगमंचाच्या उद्घाटनप्रसंगी रामेश्वर फुलशंकर, सुंदर सोनवणे, महेश जोशी, गणेश जोशी, रोशन जैन, अ‍ॅड. जी. एन. चिंचोलकर, डी. एस. जाधव, प्रभाकर स्वामी आदींसह महिलांची उपस्थिती होती. नाथ प्रांगण येथील सावरकर उद्यानातील उद्घाटनप्रसंगी महिलांनी राजेंद्र दर्डा यांचे औक्षण केले. चेअरमन शिंदे, काटे, ढवळेकाका, डॉ. बळे, शहा व विनायक डोंगरकर यांनी स्वागत केले. यावेळी सतीश बागडे, पी. जी. कुलकर्णी, राजू सालपे, सुभाष पवार, सुरेश पवार, योगेश मसलगे पाटील, अशोक पगार, रामेश्वर पवार, सुनील डोलारकर,राजू पत्की, लता कस्तुरे, शुभांगी चंद्रात्रे, प्रेमा जगताप, शुभांगी लिंगाडे, निर्मला सालपे, प्रा. शेषराव जाधव, रतन राऊत आदींची उपस्थिती होती. यावेळी राजेंद्र दर्डा यांनी वॉर्ड क्र. ८४ मध्ये त्यांच्या प्रयत्नातून झालेल्या विविध विकासकामांची यादीच वाचून दाखविली. अथर्व वाटिकेतील उद्घाटनप्रसंगी बाबूलाल जैन, रवींद्र जैन, मधुकर खानोरे, मीरा प्रधान, सुनंदा खरात, बुट्टे, बागूल, पाटील, राऊत, वाघ, चौधरी, जाधव, बोडखे, भंगाळे आदींची यावेळी उपस्थिती होती. चालता चालता चार कामे मंजूरएक काम संपले की, दुसरी मागणी लगेच होत असते. कल्पतरू सोसायटीतील अनेक कामे लोकांच्या मागणीनुसार व गरजेनुसार राजेंद्र दर्डा यांनी लीलया करून दिली; पण खुल्या रंगमंचाच्या निमित्ताने राजेंद्र दर्डा आले आहेत, हे कळताच लोकांचे थवेच्या थवे त्यांना भेटायला येत व आपल्या मागण्या मांडत. अशा चार मागण्या त्यांनी चालता चालता मान्य केल्या, हे विशेष होय.