शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारीपणा, मराठा आरक्षण मिळत नसल्याने तरुणाने संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 15:41 IST

व्हॉटसअॅपवर लहान भावाला सुसाईड नोट पाठवून उचलले टोकाचे पाऊल

वाळूजमहानगर: कर्जबाजारीपणा व उपोषण करुनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने एका २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार (दि.१५) सकाळी वडगावात उघडकीस आली आहे. दत्ता कालीदास महिपाल (रा.शिंदेवाडी, ता.माजलगाव, जि.बीड, ह.मु.वडगाव) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी दत्ता याने त्याचा लहान भाऊ महेश याच्या व्हॉटसअॅप नंबरवर सुसाइड नोट पाठवली होती. 

दत्ता महिपाल हा तरुण मुळचा बीड जिल्ह्यातील शिंदेवाडी येथील रहिवाशी असून काही दिवसापूर्वी तो रोजगाराच्या शोधात वाळूज उद्योगनगरीत आला होता. उद्योगनगरीत रोजगाराची संधी मिळाल्याने दत्ता हा वडगावातातील विलास शेजवळ यांच्या घरात भाड्याने एकटाच राहत होता. मंगळवारी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास दत्ता याने सुसाइड नोट लिहून लहान भाऊ महेशच्या व्हॉटसअॅप नंबरवर पाठविली होती. मात्र महेश हा झोपेत असल्याने तो वाचू शकला नाही. 

दरम्यान, आज बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास महेशने मेसेज पहिला. त्यानंतर घाबरलेल्या महेशने नातेवाईक अशोक सुरवसे यांच्याशी संपर्क साधत दत्ताकडे जाण्यास सांगितले. घरमालक आणि सुरवसे यांनी रूममध्ये पाहिले असता दत्ता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. अत्यवस्थ दत्ता यास शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून दत्ताला मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सुसाइड नोटमधून दिले कारणदत्ताने त्याचा लहान भाऊ महेश याच्या व्हॉटसअॅपवर पाठविलेल्या चिठ्ठीत, ''‘ आय लव यु बद्रर ॲण्ड ऑल’ तसेच मी काही कारणावरुन फाशी घेत आहे. माजलगाव येथील गोपाला अर्बन या बॅंकेकडून मी १ लाख रुपये कर्ज घेतले होते. पण काही हप्ते न भरल्याने बॅंकेकडून रोज फोन येत असल्याने मी खुप त्रस्त झालो होतो. मोठ्या बिझनेस वाले कर्ज घेतात व न भरता पळून जातात, विजय माल्या असेल किंवा निरव मोदी असेल त्यांना कुणी काही बोलत नाही. पण शेतकऱ्यांनाच सर्व बोलतात. दुसरे कारण मराठा आरक्षण मिळत नाही, कारण काय आहे, मी उपोषण करुन काय फायदा झाला नाही, सरकारने याची भरपाई करावी, स्वाॅरी मम्मी-पप्पा सुखी रहा, तुमचा दत्ता'', असा मजकूर सुसाइड नोटमध्ये आढळून आला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण