प्रतीक्षा संपली, छत्रपती संभाजीनगरहून २८ मार्चपासून बंगळुरूसाठी विमानसेवा
By संतोष हिरेमठ | Updated: March 3, 2023 15:33 IST2023-03-03T15:32:07+5:302023-03-03T15:33:36+5:30
आठवड्यात मंगळवार, गुरुवार, शनिवार या तीन दिवशी ही विमानसेवा राहील.

प्रतीक्षा संपली, छत्रपती संभाजीनगरहून २८ मार्चपासून बंगळुरूसाठी विमानसेवा
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरहून २८ मार्चपासून बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. इंडिगोकडून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी दिली.
आठवड्यात मंगळवार, गुरुवार, शनिवार या तीन दिवशी ही विमानसेवा राहील. मंगळवार, गुरुवारी बंगळुरू येथून दुपारी ४ वाजता विमान उड्डाण घेईल आणि छत्रपती संभाजी नगरला सायंकाळी ५.३५ वाजता दाखल होईल. त्यानंतर सायंकाळी ६.०५ वाजता हे विमान बंगळुरूसाठी विमानतळावरून उड्डाण घेईल.
तर शनिवारी हे विमान बंगळुरू येथून दुपारी २ वाजता विमान उड्डाण घेईल आणि छत्रपती संभाजी नगरला सायंकाळी ३.३५ वाजता दाखल होईल. त्यानंतर दुपारी ४.०५ वाजता हे विमान बंगळुरूसाठी विमानतळावरून उड्डाण घेईल.