शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

मतदान प्रक्रिया १५ जानेवारी रोजी झाली, मग १४ तारखेला २२५ मतदान झाले कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 13:41 IST

लेखी आक्षेप घेतलेल्या उमेदवारांना उत्तरे देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची दमछाक झाली.

छत्रपती संभाजीनगर : झोन क्रमांक २ अंतर्गत १५, १६ आणि १७ प्रभागांची मतमोजणी सकाळपासून सुरळीत चालली होती. पण, शेवटच्या टप्प्यात प्रभाग १६ ‘ड’मधील मतमोजणीच्या वेळी, १४ तारखेला २२५ मतदान झाल्याचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आले. यामुळे मतमोजणी कक्षात एकच हल्लकल्लोळ माजला. लेखी आक्षेप घेतलेल्या उमेदवारांना उत्तरे देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची दमछाक झाली. तब्बल दोन तास हा प्रकार सुरू होता.

नेमके काय घडले?शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सकाळी १० वाजेपासून या तीनही प्रभागांची मतमोजणी सुरू झाली. दुपारी २ वाजेच्या सुमारास प्रभाग १६ ‘ड’च्या मतमोजणी प्रसंगी एका ‘ईव्हीएम’मध्ये १४ जानेवारी रोजी झालेल्या २२५ मतदानावर उद्धवसेनेचे उमेदवार राजेंद्र दानवे व त्यांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. त्यानंतर उपस्थित अभय टाकसाळ व अन्य उमेदवारांनी व त्यांच्या प्रतिनिधींनीदेखील आक्षेप घेत उत्तर मागितले. त्यामुळे दोन तास मतमोजणी प्रक्रिया ठप्प झाली. हा प्रकार पाहून सुरुवातीला मतमोजणी कर्मचारी व अधिकाऱ्यांना घामच फुटला. निवडणूक निर्णय अधिकारी निशेष अपार यांनी यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला; पण कोणी ऐकण्याच्या तयारीत नव्हते. अखेर पोलिस आयुक्त प्रवीण पवार व दंगाकाबू पथकाचे कमांडो मतमोजणी कक्षात दाखल झाले. त्यानंतर राजेंद्र दानवे यांच्यासह अन्य उमेवार त्यांच्या प्रतिनिधींनी ‘आमच्यावर दबाव टाकण्यासाठी पोलिस आयुक्तांना बोलावण्यात आले का’, असे म्हणत गोंधळ घातला. त्यावर ‘रुटीन’ भेट आहे, असे म्हणत पोलिसांना मतदान कक्षाच्या बाहेर जावे लागले.

हा तर ‘क्लॉक एरर’ ...शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश अपार यांनी राज्य निवडणूक आयोगास घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यावर उत्तर मिळाले की, हा प्रकार ‘क्लॉक एरर’ असल्यामुळे १५ तारखेला झालेले मतदान १४ मध्ये दाखविले गेले’. पण, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी ऐकायला तयार नव्हते. शेवटी या घटनेचा निषेध करीत उमेदवार मतमोजणी कक्षाच्या बाहेर निघून गेले आणि साडेचार- पावणेपाच वाजता निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला.

अधिकारी काय म्हणतात?या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश अपार यांनी सांगितले की, उमेदवारांचा गैरसमज झाला. हा ‘क्लॉक एरर’ होता. मतदारांनी मतदान केल्यानंतर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. दुसरीकडे, ‘ईव्हीएम’ बंद करताना उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या जातात. तपासणीमध्ये या बाबी समोर आल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Voting on 15th, but 225 votes recorded on 14th? Confusion reigns.

Web Summary : Aurangabad election count disrupted by 225 votes mysteriously recorded on January 14th. Candidates protested, alleging irregularities in EVM. Officials cited a 'clock error,' leading to uproar and temporary halt of counting before results were declared.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६EVM Machineईव्हीएम मशीन