छत्रपती संभाजीनगर : पतीने केलेल्या तक्रारीत पत्नी व तिच्या मित्राला मदत करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दौलताबाद ठाण्याची महिला पोलिस अंमलदार लता बाळासाहेब दराडे (३७) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. गुरूवारी सायंकाळी ५ वाजता दराडेच्या गारखेड्यातील एमरॉल्ड सिटी या सोसायटतील घरातच तिच्या हातात बेड्या ठोकण्यात आल्या.
दौलताबाद परिसरात राहणाऱ्या तरुणाचा त्याच्या पत्नी व तिच्या मित्रावरील संशयातून वाद होत होते. तरुणाने दौलताबाद पोलिसांकडे दोघांवर कारवाई करण्यासाठी पाच दिवसांपूर्वी तक्रार दिली होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार सदर तक्रारीचा तपास अंमलदार दराडेकडे देण्यात आला होता. त्यात दराडेने गैरअर्जदार म्हणजेच तरुणाची पत्नी व तिच्या मित्राला दि. २५ नोव्हेेंबर रोजी ठाण्यात बोलावले. पतीच्या तक्रारीत कारवाई न करून मदत करण्यासाठी दराडेने त्यांना प्रत्येकी दहा हजार असे एकूण २० हजार रुपये मागितले. यामुळे संतप्त तरुणी व तरुणाने दि. २६ नोव्हेंबर रोजी एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे तक्रार केली. कांगणे यांच्या सूचनेवरून पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, संगिता पाटील यांनी तक्रारीची खातरजमा केली. त्यात दराडे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले.
पहिले ठाण्यात रचला सापळा, पण घरातच पडल्या बेड्याउपअधीक्षक शिंदे व पाटील यांनी दि. २७ नोव्हेंबरला लाच प्रकरणात सापळा रचला. तक्रारदार तरुणी व तरुणाने दराडेला संपर्क केला. तेव्हा तिने त्यांना पहिले ठाण्यात बोलावले. एसीबी पथकाने पहिले ठाण्यात सापळा रचला. मात्र, दराडे घरी निघून गेली. तरुणाने पुन्हा संपर्क केला तेव्हा दराडे माझ्या घरीच या, असे सांगितले. सायंकाळी पथकाने पुन्हा तिच्या साेसायटीत सापळा रचला. घरात जाऊन दराडेने २० हजार रुपये स्वीकारताच ठरल्याप्रमाणे तक्रारदारांनी केसांवरून हात फिरविण्याचा इशारा केला. इशारा मिळताच दबा धरून बसलेल्या अंमलदार दीपक इंगळे, सचिन बारसे, रामेश्वर गोरे, सी. एन. बागुल यांनी धाव घेत दराडेला अटक केली.
Web Summary : A female police officer in Daulatabad was arrested for accepting a 20,000-rupee bribe to help a woman and her friend. The Anti-Corruption Bureau (ACB) initially set a trap at the police station, but ultimately arrested her at her residence after she accepted the money.
Web Summary : दौलताबाद की एक महिला पुलिस अधिकारी को एक महिला और उसके दोस्त की मदद करने के लिए 20,000 रुपये की रिश्वत लेने के आरोप में गिरफ्तार किया गया। भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो (एसीबी) ने पहले थाने में जाल बिछाया, लेकिन बाद में उसे घर पर पैसे लेते हुए गिरफ्तार कर लिया।