शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

परिस्थितीला हरवून त्या तिघी जिंकल्या, मनपा शाळेतील विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 13:16 IST

पुढे जाऊन आयएएस, आयपीएस होण्याचे आहे स्वप्न

छत्रपती संभाजीनगर : हलाखीच्या परिस्थितीत शिकत असलेल्या मिटमिटा येथील मनपा शाळेतील तीन मुलींनी १० वी बोर्डाच्या परीक्षेत ९० टक्क्यांवर गुण मिळवत आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. यातील एका मुलीची आई लोकांच्या घरी धुणीभांडी करते तर एकीचे आई-वडील दुसऱ्यांच्या शेतात काम करतात. प्रतिकूल परिस्थितीत कुठल्याही सुखसोयी नसताना परिस्थितीला हरवून या तिघी जिंकल्या. पुढे जाऊन तिघींनाही प्रशासकीय अधिकारी व्हायचे आहे.

मिटमिटा येथील महानगरपालिकेच्या शाळेचा दहावीचा निकाल ९५ टक्के लागला. विशेष म्हणजे या शाळेत मुलींनीच बाजी मारली आहे. गौरी गोलवाडने ९४ तर पूजा सूर्यवंशी आणि आकांक्षा तुपेने ९० टक्के गुण मिळवले. या तिन्ही मुली सामान्य घरातून येतात. कुठलीही खासगी शिकवणी न लावता, महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेत, सोयीसुविधा नसतानाही त्यांनी मिळवलेले यश सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरत आहे.

मला खूप शिकायचेय‘लोकमत’ने या तिघींशी विशेष संवाद साधत त्यांचा संघर्ष जाणून घेतला. यावेळी ९४ टक्के गुण मिळवणाऱ्या गौरी गोलवाडने सांगितले की, तिचे आई-वडील दोघेही दुसऱ्याच्या शेतात काम करतात. कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ यामुळे शेतीतून फार उत्पन्न निघत नाही. मात्र लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या गौरीने त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. ‘ही तर सुरुवात आहे, पुढे अजून खूप शिकायचेय आणि आई-वडिलांना सगळी सुखे द्यायचीत’, असे ती म्हणाली.

आईच्या कष्टांचे चीजपूजाचे वडील भास्कर सूर्यवंशी हयात नाहीत. वडिलांच्या माघारी आईने कष्टाने तिला आणि भावाला मोठे केले. आईचे कष्ट तिने वाया जाऊ दिले नाहीत. बेताच्या परिस्थितीत शाळा, अभ्यास, आईच्या माघारी घरातील सर्व कामे करत तिने जिद्दीने अभ्यास केला. पूजाच्या आई कल्पना यांनी यावर्षी जास्त घरांची कामे घेतली. झेपत नसतानाही मुलीला अभ्यास करताना काही कमी पडू नये यासाठी त्यांनी कष्ट उपसले. पूजाला पुढे अधिकारी व्हायचेय.

आयपीएस व्हायचेयआकांक्षा तुपे ही मध्यमवर्गीय आहे. तिचे वडील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. पुढे जाऊन तिला आयपीएस व्हायचे आहे. कितीही अडचणी आल्या तरी या ध्येयावरून आपण मागे हटणार नाही, असा विश्वास तिने व्यक्त केला.

मनपा शाळांमध्ये  ७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांवर गुणमहापालिका शाळांमध्ये गुणवत्ता वाढावी, यासाठी प्रशासनाने जोरदार प्रयत्न केले. दहावीच्या निकालात हे परिणामही दिसून आले. मुकुंदवाडी शाळेतील विद्यार्थी यश दाभाडे याने ९५ टक्के गुण मिळविले. मनपा शाळांचा निकाल ७७ टक्के, तर ७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांवर गुण घेतले. महानगरपालिकेच्या एकूण १७ माध्यमिक शाळा असून, ८२१ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यातील ६३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मिटमिटा शाळेची गौरी गोलवाड, नारेगाव उर्दू शाळेची बुशरा अन्सारी हिने ९४ टक्के गुण घेतले. किराडपुरा नं. १ या शाळेचा शेख मुजाहिद याने ९१.६० टक्के, मुकुंदवाडी शाळेचा सिद्धार्थ खोले ९०.६० टक्के, पूजा सूर्यवंशी, आकांक्षा तुपे हे मिटमिटा शाळेचे विद्यार्थी ९० घेत गुणवत्ता सिद्ध केली.

सर्व विद्यार्थ्यांचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी कौतुक केले. एका परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून कोणीही खचून न जाण्याचे आवाहन त्यांनी केले. माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, उपायुक्त अंकुश पांढरे, नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे, शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोरे, अधीक्षक गोविंद बाराबोटे, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी गुणवंतांच्या यशाचे कौतुक केले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका