शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यात टेम्पो उलटला; पाण्यात बुडून बापाचा मृत्यू, चिमुकलीचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 19:22 IST

वळणावर रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने कालव्यात टेम्पो उलटला

- जयेश निरपळगंगापूर: नांदूर मध्यमेश्वर कालव्याच्या पाण्यात टेम्पो उलटून झालेल्या अपघातात सुधाकर अशोक वैराळ(३०, रा.वरखेड ता.गंगापूर ) यांचा मृत्यू झाला. तर त्यांची तीन वर्षाची मुलगी श्रद्धा पाण्यात वाहून गेली असून तिचा शोध सुरू आहे. सदरील घटना गंगापूर वैजापूर मार्गावरील वरखेड पाटी येथील नांमक कालव्याच्या जवळ मंगळवारी (२९) रोजी दुपारी एकच्या दरम्यान घडली.

याविषयी अधिक माहिती अशी की तालुक्यातील वरखेड येथील सुधाकर वैराळ हे सोमवारी आपल्या तीन वर्षीय मुलीसह टेम्पो (एमएच २० ईजी ०९६६) चालवत गंगापूरहून नांदूर मधमेश्वर कालव्याच्या बाजूने असलेल्या रस्त्याने वरखेड गावाकडे जात असताना दुपारी एकच्या दरम्यान गंगापूर वैजापूर मार्गापासून एक किमी अंतरावर एका ठिकाणी वळण घेतांना टेम्पो कालव्याच्या पाण्यात उलटला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन जेसीबीच्या मदतीने टेम्पो कालव्यातून पाण्याच्या बाहेर काढला. त्यांनतर सुधारक मैराळ यांना टेम्पो बाहेर घेऊन सागर शेजवळ यांच्या रुग्णवाहिकेतून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून सुधाकर यांना मृत घोषित केले. तर तीन वर्षांच्या मुलीचा शोध सुरु आहे. घटनेची शिल्लेगाव पोलिसांत नोंद करण्यात आली आहे 

घरात एक महिन्याची तांन्हुलीशविच्छेदनानंतर सायंकाळी साडेपाच वाजता सुधाकर यांच्या पार्थिवावर वरखेड येथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, तीन बहिणी असा परिवार आहे. एक महिन्यापूर्वीच त्यांना एक मुलगी झाली आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता. ऐन रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला एकुलता एक भाऊ गमावल्याने सुधाकर यांच्या तिन्ही बहिणींनी हंबरडा फोडला होता. 

रस्ता अडवल्याने अपघातवरखेड गावात जाण्या-येण्यासाठी नांमक कालव्याच्या बाजूने रस्ता असून हा रस्ता सदरील अपघात स्थळाजवळच एका व्यक्तीने जागेचा मोबदला मिळाला नाही म्हणून अडवला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यामुळे येथे अनेकदा वाहने घसरून अपघात देखील झाले आहे. याविषयी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अर्ज करण्यात आले. मात्र तरीही प्रशासनाला जाग आली नाही. सुधाकर यांचा दुर्दैवी मृत्यू देखील अडवलेल्या रस्त्याच्या खालून पाण्याच्या बाजूने टेम्पो धोकादायक रित्या चालवताना झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू