शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

स्वच्छता मोहीमेची व्याप्ती वाढली; ग्रामीण भागातही घरासमोर येऊन कचरा गोळा केला जाणार

By विजय सरवदे | Published: January 18, 2024 6:50 PM

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींत राबविली जातेय स्वच्छता मोहीम

छत्रपती संभाजीनगर : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींमध्ये ही कामे केली जाणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सरत्या वर्षात जिल्ह्यातील ६२६ गावे घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनासाठी निवडण्यात आली होती. यंदा जिल्ह्यातील सर्व गावांची निवड करण्यात आली आहे. 

अस्वच्छता हेच आरोग्य बाधित होण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे गावांमध्ये श्वास्वत स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. केवळ कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन म्हणजेच स्वच्छता नाही, तर ग्रामीण नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणीही देणे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्या दृष्टिकोनातून गावात घनकचरा व्यवस्थापनामध्ये ‘सेग्रीगेशन शेड’ म्हणजेच ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी शेड उभारण्यात येत आहे. कचऱ्यातील प्लास्टिक, लोखंड व अन्य वस्तू वेगळे करून सुका कचऱ्यावर खत प्रक्रिया केली जाणार आहे.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण काय आहे?स्वच्छ भारत मिशन ग्रामीण म्हणजे प्रत्येक गाव स्वच्छ आणि सुंदर व्हावे, यासाठी वैयक्तिक शौचालये, सार्वजनिक शौचालये, गावातील इतर सरकारी- निमसरकारी कार्यालये तसेच शाळा, अंगणवाडीमध्ये शौचालयाची व्यवस्था असावी व त्याचा वापर व्हावा. पिण्याचे शुद्ध पाणी असावे. गावाचा परिसर स्वच्छ सुंदर असावा. रस्त्याच्या दुतर्फा तसेच प्रत्येक घरासमोर एक तरी झाड असावे, म्हणजेच गावात सर्वांगीण स्वच्छता असावी अर्थातच दृश्यमान स्वच्छता असावी.

कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायती?तालुका- गावे- ग्रामपंचायतछत्रपती संभाजीनगर -१७७-११५फुलंब्री- ९३ - ७२सिल्लोड- १२४- १०४,सोयगाव- ७३- ४६,कन्नड- २००- १३८खुलताबाद- ७३- ३९वैजापूर - १६४- १३५गंगापूर- २१०- १११पैठण- १८५- ११०

बचत गट गोळा करणार कचराप्रत्येक गावातील घनकचरा एकत्र करून तो व्यवस्थापन प्रकल्पामध्ये जमा केला जाणार आहे. त्यासाठी बचत गट तसेच ग्रामपंचायतीला विक्रीतून उत्पन्न होईल या उद्देशाने बचत गट कचरा विलगीकरण करणार आहे.

ओला, सुका वर्गीकरण करून खतनिर्मितीप्रत्येक गावातून ओला कचरा, सुका कचरा असे वर्गीकरण करून घंटागाडीच्या मार्फत घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी आणला जाईल. त्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने खतनिर्मिती करून विक्री केली जाणार आहे.

गावातील स्वच्छता टिकून राहील प्रत्येक गावात घनकचऱ्याचे शेड उभारण्यात येत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावात मार्किंगचे काम सुरू असून काही ठिकाणी शेड तयार झालेले आहेत, तर काही ग्रामपंचायतींनी ट्राय सायकल, घंटागाडी तसेच इतर वाहनांचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे. घरातील कचरा देताना तो ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करूनच तो घंटा गाडीवाल्याकडे द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावातील स्वच्छता टिकून राहील.- राजेंद्र देसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबाद