शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलाचा सच्चा साथीदार हरपला! २८ गंभीर गुन्ह्यांची उकल करणारी श्वान 'खुशी'चे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:10 IST

अठ्ठावीस गुन्ह्यांची उकल करणाऱ्या श्वान खुशीला अखेरचा निरोप

छत्रपती संभाजीनगर: हत्या, दरोडा, आणि घरफोडीसारख्या २८ गंभीर गुन्ह्यांची यशस्वीपणे उकल करून छत्रपती संभाजीनगरपोलिसांना मदत करणारी श्वान 'खुशी' हिचे रविवारी निधन झाले. डॉबरमॅन जातीच्या या प्रशिक्षित श्वानाला पोलिसांनी भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप दिला, ज्यामुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

गुन्हे उघडकीस आणण्यात निपुण२० नोव्हेंबर २०१३ रोजी जन्मलेल्या खुशीला पुण्यातील श्वान प्रशिक्षण केंद्रात विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. मार्च २०१५ मध्ये, ती जिल्हा पोलीस दलाच्या बॉम्बशोधक पथकात सामील झाली. केवळ बॉम्ब शोधण्यातच नाही, तर गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींचा माग काढणे आणि पुरावे गोळा करणे यात ती निष्णात होती. तिच्या सेवा काळात तिने अनेक मोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना महत्त्वपूर्ण मदत केली. तिच्या याच महत्त्वपूर्ण योगदानामुळे तिला अनेकदा सन्मानितही करण्यात आले होते.

सेवाकाळातच निधनजवळपास दहा वर्षे पोलीस दलात सेवा दिल्यानंतर, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच खुशीने जगाचा निरोप घेतला. तिच्या निधनामुळे पोलीस दलातील प्रत्येकाने दुःख व्यक्त केले. तिच्या निधनानंतर पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, आणि उपअधीक्षक गौतम पातारे यांनी तिला श्रद्धांजली वाहिली. हँडलर पी. आर. मिसार आणि व्ही. एस. तळेकर यांनी गेली दहा वर्षे तिची काळजी घेतली होती. एका सहकाऱ्याला गमावल्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

सेवा, निष्ठा आणि शौर्याचे प्रतीकश्वान 'खुशी' ही केवळ एक पोलीस श्वान नव्हती, तर ती पोलीस दलातील एक निष्ठावान सदस्य होती. तिने दिलेल्या योगदानाबद्दल पोलीस दल कायमच तिची आठवण ठेवेल. तिच्या निधनाने पोलीस दलाला निश्चितच मोठा तोटा झाला आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीdogकुत्राPoliceपोलिस