संत शक्तीने विरोधकांचा झाला पराभव : फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:33 IST2025-08-07T12:32:32+5:302025-08-07T12:33:51+5:30
लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक प्रयोग झाला. व्होट जिहाद ही व्यवस्था उभी राहिली आणि राष्ट्रीय विचारांना पराजित करण्यासाठी एकत्र आली. ज्यावेळी हे षडयंत्र आमच्या लक्षात आलं त्यावेळी आम्ही महाराष्ट्रातील आध्यात्मिक शक्तीला आवाहन केलं आणि सांगितले की, हे राजकीय आक्रमण नाही, हे सांस्कृतिक आक्रमण आहे.

संत शक्तीने विरोधकांचा झाला पराभव : फडणवीस
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) : निवडणुकीच्यावेळी विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह तयार करून प्रचार केला. त्यामुळे त्यांचे व्होट जिहादचे आक्रमण हे हिंदू संस्कृतीवर आक्रमण आहे, हे जेव्हा आम्ही रामगिरीजी महाराज व संत शक्तीच्या लक्षात आणून दिले. तेव्हा सर्व संत शक्ती मैदानात उतरली. त्यामुळे विरोधकांचा विधानसभा निवडणुकीत सुपडासाफ झाला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शनि देवगाव येथे केले.
सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक प्रयोग झाला.
षडयंत्र उधळून लावले -
लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक प्रयोग झाला. व्होट जिहाद ही व्यवस्था उभी राहिली आणि राष्ट्रीय विचारांना पराजित करण्यासाठी एकत्र आली. ज्यावेळी हे षडयंत्र आमच्या लक्षात आलं त्यावेळी आम्ही महाराष्ट्रातील आध्यात्मिक शक्तीला आवाहन केलं आणि सांगितले की, हे राजकीय आक्रमण नाही, हे सांस्कृतिक आक्रमण आहे.
सरकारं येतील, सरकारं जातील, कोणीही परमनंट राहत नाही; पण आपला देश आणि आपला धर्म हा कायम राहिला पाहिजे, असं आवाहन केलं, तेव्हा सर्व संत शक्ती, आध्यात्मिक शक्ती आमच्यासाठी मैदानात उतरली. त्यामुळेच लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा सुपडासाफ झाला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.