शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

गल्लीत भरधाव वाहन चालविणाऱ्याला समज देणाऱ्याचा खून, तिघांना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 14:33 IST

‘वाहन हळू चालव, एखाद्याला मारतो काय?’ अशी समज दिल्यावरून झाले होते वाद

छत्रपती संभाजीनगर : गल्लीत भरधाव वाहन चालविणाऱ्याला समज दिल्याच्या रागातून काठीने डोके फोडून त्याचा खून केल्याच्या आरोपाखाली तिघा आरोपींना सत्र न्यायाधीश एस. एम. कोचे यांनी जन्मठेप आणि प्रत्येकी २० हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास या आरोपींना एक वर्ष जादा सश्रम कारावास भोगावा लागेल, असे आदेशात म्हटले आहे.

शेख मोहम्मद सोफियान (रा. अजिंठा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २६ ऑगस्ट २०२१ रोजी त्याचे वडील शेख मोहम्मद शफियोद्दीन शेख अब्दुल रहेमान हे गल्लीत त्यांच्या घरासमोर उभे होते. त्यावेळी शेख सादिक उर्फ मुन्ना जान मोहम्मद याने भरधाव वेगाने त्याची ओमनी कार शेख मोहम्मद यांच्या अंगावर घातली. मात्र, ते बाजूला सरकले. ‘वाहन हळू चालव, एखाद्याला मारतो काय?’ अशी समज दिल्यावरून ‘तू पुढे ये, तुला उडवतो’ असे सादिकने उत्तर दिले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. नातेवाइकांनी त्यांचे भांडण सोडवले.

त्यानंतर १५-२० मिनिटांनी सादिक त्याचा भाऊ जावेद शेख आणि अथर उर्फ अत्तू बेग जाफर बेग या दोघांना घेऊन पुन्हा आला. तिघांनी शेख मोहम्मद यांच्यावर हल्ला केला. उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला आणत असताना वाटेतच शेख मोहम्मद मरण पावले. अजिंठा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक अजित डी. विसपुते यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते.

मुख्य आरोपी इतकेच सहआरोपीही जबाबदारअतिरिक्त लोकअभियोक्ता शरद बी. बांगर यांनी ७ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. प्रत्यक्षदर्शी आणि पंच साक्षीदारांच्या जबाबानुसार सहआरोपी जावेद आणि अथर यांनी मयताला दांड्याने मारहाण केली नाही. तरी ते सुद्धा दांड्याने मारहाण करणाऱ्या सादिकइतकेच जबाबदार असल्यामुळे त्यांना सुद्धा जन्मठेप ठोठावण्यात यावी अशी आग्रही मागणी बांगर यांनी केली. मुख्य आरोपी इतकेच सहआरोपीही जबाबदार ठरवून न्यायालयाने शिक्षा सुनावली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादCourtन्यायालय