मोबाइल खराब झालाय? दगडातील बॅक्टेरिया लावणार विल्हेवाट; छत्रपती संभाजीनगरमधील प्राध्यापकाचे पंधरा वर्षांपासून संशोधन 

By राम शिनगारे | Updated: January 6, 2024 09:47 IST2024-01-06T09:44:53+5:302024-01-06T09:47:44+5:30

बॉक्साईटच्या खाणीतील दगडांमधील बॅक्टेरियापासून संगणक, मोबाइल, चार्जर, टीव्ही, रिमोटसह इतर विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये असलेल्या मदर बोर्ड म्हणजेच प्रिटेंड सर्किट बोर्डची (पीसीबी) पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्याचे संशोधन विवेकानंद महाविद्यालयातील बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभागात केले आहे.

The mobile is damaged Dispose of the bacteria in the stone; Research by a professor in Chhatrapati Sambhajinagar for fifteen years | मोबाइल खराब झालाय? दगडातील बॅक्टेरिया लावणार विल्हेवाट; छत्रपती संभाजीनगरमधील प्राध्यापकाचे पंधरा वर्षांपासून संशोधन 

मोबाइल खराब झालाय? दगडातील बॅक्टेरिया लावणार विल्हेवाट; छत्रपती संभाजीनगरमधील प्राध्यापकाचे पंधरा वर्षांपासून संशोधन 

छत्रपती संभाजीनगर : बॉक्साईटच्या खाणीतील दगडांमधील बॅक्टेरियापासून संगणक, मोबाइल, चार्जर, टीव्ही, रिमोटसह इतर विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये असलेल्या मदर बोर्ड म्हणजेच प्रिटेंड सर्किट बोर्डची (पीसीबी) पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्याचे संशोधन विवेकानंद महाविद्यालयातील बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभागात केले आहे. या संशोधनाचा व्यावसायिक वापर व पेटंटसाठी केंद्र शासनाच्या ‘बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंट कौन्सिल’ म्हणजेच बायरॅक संस्थेने पुढाकार घेतल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. नितीन अधापुरे यांनी दिली. 

धातूमिश्रणाचा अडथळा
इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील मदर बोर्ड कॉपर, निकेल लेड, टिन, ॲल्युमिनियम, सोने-चांदीसह इतर धातूंच्या मिश्रणातून बनविले जातात. त्यामुळे त्याची विल्हेवाट लावणे कठीण जाते. अशा मदर बोर्डची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यासाठी डॉ. अधापुरे हे २००८ पासून संशोधन करीत आहेत. त्यांना ज्येष्ठ मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. अरविंद देशमुख यांचे सहकार्य मिळत आहे. 

मदर बोर्डचे सध्या होते काय? 
अनेक ठिकाणी मदर बोर्ड जाळून टाकतात. जळालेल्या मदरबोर्डमधील सर्व धातू एकत्र होऊन गट्टू तयार होतो. हे गट्टू परदेशात मोठ्या किमतीमध्ये विकण्यात येतात. विशेषत: बेल्जियममध्ये याविषयीचे तंत्रज्ञान अधिक प्रगत असल्यामुळे त्याठिकाणी गट्टू पाठवितात. त्याठिकाणी सर्व धातू वेगवेगळे करून पुन्हा वापरात आणले जातात.

असे केले संशोधन    
सुरुवातीला १० लिटर नंतर १०० लिटरच्या भांड्यामध्ये मदर बोर्डची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यात आली. अमोनियम सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट आदीच्या माध्यमातून प्रक्रिया केली. कर्नाटकातील चित्रदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील बॉक्साईट खाणीतून दगड आणले.
बॅक्टेरियाच्या प्रजाती तपासून घेतल्या.

या संशोधनाचे महाविद्यालयाच्या नावाने पेटंट फाईल करीत असून, त्याच्या व्यावसायिक वापरासाठी विविध उद्योगांसोबत बोलणी सुरू आहेत. 
- डॉ. नितीन अधापुरे, संशोधक

Web Title: The mobile is damaged Dispose of the bacteria in the stone; Research by a professor in Chhatrapati Sambhajinagar for fifteen years