पीककर्ज देण्यात राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखडता; सहकारी बँका कर्ज देण्यात आघाडीवर
By विकास राऊत | Updated: June 27, 2024 19:26 IST2024-06-27T19:25:38+5:302024-06-27T19:26:27+5:30
राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यात टाळाटाळ करीत आहेत. सीबिल तपासत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत.

पीककर्ज देण्यात राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखडता; सहकारी बँका कर्ज देण्यात आघाडीवर
छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगाम २०२४-२५ या वर्षासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी राष्ट्रीयीकृत खासगी व सहकारी बँकांना १५५४ कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे लक्ष्य दिले आहे. आजवर ४६ टक्के कर्ज शेतकऱ्यांना दिले असून राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या तुलनेत सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना अर्थसाह्य करण्याचे प्रमाण जास्त आहे.
राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यात टाळाटाळ करीत आहेत. सीबिल तपासत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत.
जिल्ह्यातील २८६ बँकांना १५५४ कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. ९८ हजार ३७९ खातेदारांना ७१० कोटींचे कर्ज या बँकांनी आजवर दिले.
कोणत्या बँकांना किती उद्दिष्ट?
राष्ट्रीयीकृत बँका : ११९,
कर्ज वाटप उद्दिष्ट ७३५ कोटी,
किती कर्ज वाटप? : १७१ कोटी
टक्केवारी : २३ टक्के
खासगी बँका : १७
कर्ज वाटप टार्गेट : १३६ कोटी
किती कर्ज वाटप? : १९ कोटी
टक्केवारी : १४ टक्के
ग्रामीण बँका : ३१
कर्ज वाटप उद्दिष्ट : २२७ कोटी
किती कर्ज वाटप? : १६२ कोटी
टक्केवारी : ६७ टक्के
सहकारी बँका : ११९
कर्ज वाटप उद्दिष्ट : ४५४ कोटी
किती कर्ज वाटप? : ३५७ कोटी
टक्केवारी : ७९ टक्के
राष्ट्रीयीकृत बँकांनी किती कर्ज दिले?
बँकेचे नाव...............शाखा.......कर्ज टार्गेट..........खातेदार..........कर्ज वाटप रक्कम........टक्केवारी
बँक ऑफ बडोदा...... ....१७..........७४.६३ कोटी........६२८................८ कोटी ५२ लाख ...........११ टक्के
बँक ऑफ इंडिया..........६...........४१.३२ कोटी.............४०१..............४ कोटी ३४ लाख ............११ टक्के
बँक ऑफ महाराष्ट्र..........२५........१६३.१६ कोटी..........२३५०...........३० कोटी २१ लाख ...........१९ टक्के
कॅनरा बँक......................११...........४.८८ कोटी.........४१..................१ कोटी ४२ लाख..............२९ टक्के
सेंट्रल बँक ऑफ इंडिया.....१०............५६.६४ कोटी........१००१...............१२ कोटी ६ लाख ...........२१ टक्के
इंडियन बँक..................४.........२१.६ कोटी..............७१४..................७७ लाख.....................४ टक्के
पंजाब नॅशनल बँक.......७...........१७.३० कोटी...........९५..................२ कोटी ९८ लाख.........१७ टक्के
स्टेट बँक ऑफ इंडिया....३५.......३२०.५३ कोटी.......११७००................१०९ कोटी २५ लाख.....३४ टक्के
युनियन बँक ऑफ इंडिया...४........३५.६९ कोटी......१४७......................१ कोटी ९४ लाख .............५ टक्के
एकूण.............................११९.......७३५.२१ कोटी......१७०७७.................१७१ कोटी ४९ लाख .....२३ टक्के
खासगी बँकांनी किती कर्ज दिले?
बँकेचे नाव...............शाखा.......कर्ज टार्गेट..........खातेदार..........कर्ज वाटप रक्कम........टक्केवारी
ॲक्सिस बँक.................३..............१९.५० कोटी.........१६..................१ कोटी ६५ लाख...........८ टक्के
सीएसबी बँक................००..............००.......................००.................००.................................०० टक्के
एचडीएफसी बँक............४............६५.१९ कोटी...........१०४६..............१४ कोटी ९५ लाख...........२३ टक्के
आयसीआयसीआय बँक....५...........२६.३१ कोटी.......४५..................७० लाख.......................३ टक्के
आयडीबीआय बँक..........४.............११.६० कोटी.......४२................७० लाख.....................६ टक्के
आरबीएल बँक............१................१४.३१ कोटी.......४..................६६ लाख......................५ टक्के
एकूण...................१७.................१३६.९१ कोटी......११५८.............१९ कोटी २१ लाख.......१४ टक्के
सहकारी बँकांनी किती कर्ज दिले?
बँकेचे नाव...............शाखा.......कर्ज टार्गेट..........खातेदार..........कर्ज वाटप रक्कम........टक्केवारी
महा.ग्रामीण बँक......३१...........२२७.१८ कोटी.....१५३९०...........१६२ कोटी २५ लाख.....७१ टक्के
जि.म.स.बँक...........११९.........४५४.९८ कोटी......६४७५४.........३५७ कोटी ९४ लाख.....७९ टक्के