शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा जोर वाढला, मराठवाड्यातील धरणे भरू लागली, लघुप्रकल्पांनाही लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:05 IST

मराठवाड्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

छत्रपती संभाजीनगर : चार दिवसांपासून मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने प्रमुख मोठ्या प्रकल्पांत ९० टक्क्यांवर जलसाठा जमला आहे. निम्म्यावर मध्यम आणि लघुप्रकल्प भरत आले आहेत. यामुळे मराठवाड्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

‘जायकवाडी’सह मराठवाड्यात ११ मोठी धरणे आहेत. जायकवाडीच्या उर्ध्व भागात पाऊस पडत असल्याने सध्या ९४.५६ टक्के पाणीसाठा आहे. सिद्धेश्वर प्रकल्पात ९२ टक्के, येलदरी प्रकल्प ९९.५४ टक्के, निम्न दुधना ७३.१७ टक्के, मांजरा प्रकल्प ९४.२४ टक्के, निम्न तेरणा प्रकल्पात ९६ टक्के, इसापूर प्रकल्प १०० टक्के, माजलगाव- ५० टक्के, विष्णुपुरी ६३ टक्के, सीना कोळेगाव ८८ टक्के पाणीसाठा साचला आहे.

७५ मध्यम प्रकल्पांत ८० टक्के जलसाठाधुवाधार पावसामुळे ७५ मध्यम प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. चार दिवसांपूर्वी या सर्व प्रकल्पांत सरासरी ४८ टक्के जलसाठा होता. आज या प्रकल्पांत सरासरी ५१ टक्के पाणीसाठा आहे. यातील काही प्रकल्प शंभर टक्के भरल्याने सांडवे ओसंडून वाहू लागले आहेत.

लघुप्रकल्पांनाही लाभमराठवाड्यात ७५१ लघुप्रकल्प आहेत. या प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. दोन दिवसांत मराठवाड्यातील ८७ मंडळांत अतिवृष्टी झाल्याने या मंडळांतील लघु प्रकल्प तुडुंब भरले आहेत. कमी पाऊस असलेल्या मंडळांतील प्रकल्पांत ५० टक्क्यांच्या आसपास साठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

९ उच्चपातळी बंधाऱ्यांत ९० टक्क्यांवर पाणीमराठवाड्यात उच्चपातळीच्या १५ बंधाऱ्यांपैकी ९ बंधाऱ्यांत ९० टक्क्यांवर साठा आहे. उर्वरित बंधाऱ्यांत ६० ते ८० टक्के साठा आहे.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर