शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने उद्धव ठाकरेंना फोन केला? प्रसाद लाड यांनी सगळंच सांगितलं
2
छगन भुजबळ कोणत्या पक्षात? जयंत पाटील म्हणाले,"उद्या निकालानंतर सांगतो...";
3
...तर मी स्वत:ला संपवून घेईन: सोनवणेंचा निवडणूक अधिकाऱ्याला इशारा; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
4
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
5
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
6
'भाजपाला चिंतनाची गरज' म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना महाजनांनी सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी सांगा..."
7
चोराचा अजब कारनामा; चोरी करायला घरात शिरला अन् AC च्या थंडाव्यात झोपी गेला, सकाळी...
8
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
9
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
10
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
11
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
12
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
13
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
14
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
15
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
16
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
17
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
18
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
19
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
20
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका

पारंपरिक पिकांना फाटा, अद्रक उत्पादनातून तांबेवाडीच्या शेतकऱ्यांनी कमावले तब्बल ४५ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 11:17 AM

तांबेवाडी येथील अद्रक बियाणे हे निर्दोष असते. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या अद्रक बियाणांना देशभरातून मागणी असते.

छत्रपती संभाजीनगर : लहरी निसर्गावर अवलंबून न राहता, फुलंब्री तालुक्यातील तांबेवाडी येथील ७२ शेतकरी कुटुंबांनी त्यांच्या शेतात शेततळे खोदून बाराही महिने शेतीला पाणी उपलब्ध केले. एवढेच नव्हे, तर पारंपरिक पिकांना फाटा देत प्रामुख्याने अद्रकाची मुख्य पीक म्हणून लागवड सुरू केली. दहा ते बारा वर्षांपासून तांबेवाडीत अद्रक उत्पादनातून कोट्यवधींचे उत्पन्न होत आहे.

यावर्षी येथील शेतकऱ्यांनी अद्रक उत्पादनातून तब्बल ४५ कोटी रुपये कमावत शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी या गावातील ७२ शेतकरी शेतातच घर करून राहतात. तांबे आडनाव असलेल्या या शेतकऱ्यांच्या वसाहतीला तांबेवाडी हे नाव पडले आहे. २०१२ पर्यंत येथील शेतकरी ज्वारी, बाजरी, मका, कापूस या पारंपरिक पिकांची लागवड करीत असत. सिंचनासाठी मुबलक पाणी नसल्याने त्यांना रब्बी पिकांचे उत्पादनही त्यांना घेता येत नव्हते. मात्र, २०१२ पासून आतापर्यंत तांबेवाडीतील प्रत्येक शेतकरी कुटुंबाने त्यांच्या शेतात लहान, मोठ्या आकाराचे शेततळे खोदले. पावसाळ्यात ही कुटुंबे शेततळी विहिरीतील पाणी उपसून पाण्याने तुडुंब भरून घेतात. 

विहिरीचे पाणी शेतीला कमी पडू लागताच शेततळ्याच्या पाण्याचा सिंचनासाठी वापर सुरू करतात. शेततळ्याचे पाणी उपलब्ध झाल्यापासून तांबेवाडीतील सर्वच शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात अद्रकाची लागवड केली आहे. गादी वाफा पद्धतीने अद्रकाच्या लागवडीसोबत रासायनिक आणि जैविक खतांचा निम्मा, निम्मा वापर करणे, जमिनीत जास्तीत जास्त जिवाणूंची संख्या वाढेल, यासाठी कंपोस्ट खताचा वापर जाणूनबुजून करण्यात येतो. यातून त्यांना दरवर्षी अद्रकाचे चांगले उत्पादन होत असते. यावर्षी येथील शेतकऱ्यांनी तब्बल २५० एकरवर अद्रकाची लागवड केली होती. दोन महिन्यांपासून अद्रकाचे उत्पादन सुरू झाले आहे. तांबेवाडीच्या अद्रकाची गुणवत्ता सर्वोत्तम असल्याने बाजारात १० हजार रुपये प्रति क्विंटल असा दर त्यांना मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावर्षी अद्रक उत्पादनातून येथील प्रत्येक कुटुंबाने २० लाख ते दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. येथील ७२ कुटुंबांनी अद्रक उत्पादनातून तब्बल ४५ कोटी रुपयांची कमाई करून राज्यातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.

तांबेवाडीच्या अद्रक बियाणास देशभर मागणीतांबेवाडी येथील अद्रक बियाणे हे निर्दोष असते. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या अद्रक बियाणांना देशभरातून मागणी असते. बाजारात अद्रकाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत असला तर बियाण्याला ११ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतो. शेतकरी तांबेवाडी येथे येऊन अद्रकाचे बियाणे घेऊन जातात.

१२ एकरांवर अद्रकाची लागवडशेततळ्यामुळे बाराही महिने शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने तांबेवाडीचे चित्रच बदलले. आमची २५ एकर शेती आहे. यातील १२ एकरांवर अद्रकाची लागवड करण्यात आली होती. यातून एकरी ९०० क्विंटल उत्पन्न मिळाले. आम्हाला सुमारे दीड कोटीचे उत्पन्न मिळाले.- बाबा तांबे पाटील, शेतकरी, तांबेवाडी.

तांबेवाडीचा आदर्श सर्वच शेतकऱ्यांनी घ्यावातांबेवाडी येथील शेतकऱ्यांनी अद्रक उत्पादनातून रेकॉर्डब्रेक उत्पन्न मिळाल्याचे कळताच, आपण शुक्रवारी सकाळी तांबेवाडीला भेट दिली. ७२ शेतकरी कुटुंबांनी अद्रकाची लागवड केल्याचे दिसून आले. प्रत्येक कुटुंबाची एक ते दोन शेततळी आहेत. शेततळ्यामुळे त्यांना बाराही महिने सिंचनाची सुविधा झाल्याने अद्रकासह अन्य पिके ते घेतात. यंदा अद्रकाला चांगला दर मिळत असल्याने २५० एकरांवरील अद्रक उत्पादनातून तांबेवाडीकरांनी ४५ कोटी रुपयांचे उत्पन्न घेतले.--- डॉ. तुकाराम मोटे, विभागीय कृषी सहसंचालक.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद