शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगाचे संक्रमण थांबविणाऱ्या प्रभावी औषधींचा शोध; संशोधनाला मिळाले पेटंट

By राम शिनगारे | Updated: October 16, 2023 11:51 IST

म्युकर मायक्रोसिसची बुरशी, फळ टिकविण्यासाठी होणार या औषधींचा उपयोग

छत्रपती संभाजीनगर : स्तनाचा, तोंडाचा आणि कोलन कर्करोग एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत (संक्रमण) जायला थांबविण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या औषधीचा शोध विद्यापीठातील प्राध्यापकासह संशोधक विद्यार्थ्यांनी घेतला. त्यासाठी भारत सरकारने संशोधनाला नुकतेच पेटंट जाहीर केले आहे. या संशोधनाचा कर्करोगासह म्युकर मायक्रोसिससाठी कारणीभूत असलेल्या बुरशीविरोधी संक्रमण थांबविण्यासह फळांवरती नॅनोमटेरियलचा लेप दिल्यास फळे जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी उपयोग होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. प्रभाकर उंदरे यांच्यासह अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टीचर एज्युकेशन संस्थेतील डॉ. सचिन उंदरे, संशोधक विद्यार्थी डॉ. सलमा अहमद, डॉ. फैसा सैफ आणि डॉ. अहमद सालेह यांनी हे संशोधन केले आहे.'सिंथेसिस ॲण्ड फंक्शनलायझेशन ऑफ सिरअम ऑक्साईड नॅनोफ्लेक्स फॉर बायोमेडिकल ॲप्लिकेशन' या नावाच्या संशोधनाला पेटंट मिळाले. कमी खर्चात आणि सोप्या पद्धतीने सेरियम ऑक्साइड नॅनोफ्लेक्स (नॅनोमटेरियल) तयार करून त्यांची वेगवेगळ्या ॲमिनो ॲसिडचे अवरण देऊन कार्यक्षमता वाढवली.

या औषधींचे मुंबईतील टाटा मेमोरियल ॲडव्हान्सड सेंटर फाॅर ट्रिटमेंट, रिसर्च ॲण्ड एज्युकेशन इन कॅन्सर या ठिकाणी स्तनाचा, तोंडाचा, फुप्फुसाचा, कोलन आणि प्रोस्टेट कर्करोगाचे संक्रमण थांबविण्याविषयी परीक्षण केले. त्यात औषधी प्रभावी ठरल्याचे स्पष्ट झाले. तसेच विद्यापीठातील भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत पोस्ट कोविडनंतर उद्भवलेल्या म्युकर मायक्रोसिससाठी कारणीभूत असलेल्या बुरशी विरोधी संक्रमण थांबविण्याचे गुणधर्मही औषधीत आढळले. त्याशिवाय फळांवरती नॅनोमटेरियलचा लेप दिल्यास फळे जास्त दिवस टिकवून ठेवता येऊ शकतात, हे सुद्धा संशोधनातून स्पष्ट झाले. हे संशोधन पेटंटसाठी ८ ऑगस्ट २०२२ रोजी नोंदवले. त्यास २४ ऑगस्ट २०२३ रोजी भारत सरकारने मंजुरी दिली आहे.

संशोधनासाठी विद्यापीठाकडून निधीडॉ. प्रभाकर उंदरे यांनी शोधलेल्या औषधीच्या पुढील संशोधनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी एका योजनेतून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांचेही लवकरच दुसरे पेटंट मिळण्याची शक्यता असल्याचेही डॉ. उंदरे यांनी सांगितले. तसेच त्यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने २००७-१० या काळात तोंडाच्या कर्करोगाचे निदान करण्याचे संशोधन केलेले आहे.

दोन संशोधन पेटंटसाठी दाखलउद्योगाला उपयोगी ठरणारे विजेचे ० ते ५० हजार व्होल्ट दरम्यान जेवढी आवश्यकता असेल तितक्या प्रमाणात ० ते २५० व्होल्टचे रूपांतर करता येणारे संशोधन डॉ. उंदरे यांच्या टीमने केले आहे. त्या संशोधनाला पेटंट मिळावे, यासाठी भारत सरकारकडे नोंदणी केली आहे. त्याशिवाय आणखी एका संशोधनाला पेटंट जाहीर होणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण