शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यराणी एक्स्प्रेसमधील बोगींची, स्वच्छतागृहाची अवस्था वाईट; विनाआरक्षित प्रवाशांचीही घुसखोरी

By संतोष हिरेमठ | Updated: September 8, 2025 20:02 IST

मुंबईसाठी नवी रेल्वे द्याच; पण ‘राज्यराणी’कडे थोडं लक्ष द्या !

छत्रपती संभाजीनगर : जनशताब्दी, वंदे एक्स्प्रेस पळविल्यानंतर आता प्रवाशांना सकाळी १० वाजता मुंबईत पोहोचण्यासाठी राज्यराणी एक्स्प्रेसचा एकमेव पर्याय उरला आहे. त्यासाठी पहाटे तीन वाजता उठण्याचीही प्रवाशांची तयारी आहे. मात्र, या रेल्वेच्या बोगींची, स्वच्छतागृहांची अवस्था वाईट आहे. शिवाय या रेल्वेत विनाआरक्षित प्रवाशांचीही घुसखोरी रोखण्याकडेही दुर्लक्ष होते. याकडे दक्षिण मध्य रेल्वेने थोडे लक्ष दिल्यास ही रेल्वे मुंबई प्रवासासाठी प्रवाशांना अधिक सोयीची ठरेल.

पूर्वी छत्रपती संभाजीनगरहून सुटणारी जनशताब्दी एक्स्प्रेस आधी जालना आणि नंतर हिंगोलीपर्यंत नेण्यात आली. जालन्याहून धावणारी वंदे भारत एक्स्प्रेसही नांदेडला पळविण्यात आली. या दोन्ही रेल्वे मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांच्या फारशा सोयीच्या राहिल्या नाहीत. वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडला पळविल्यानंतर मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरू केली जाईल, असे सांगितले जाते. नवीन रेल्वे मिळेल तेव्हा मिळेल; परंतु आजघडीला मुंबईला लवकर पोहोचण्याच्या दृष्टीने राज्यराणी एक्स्प्रेस महत्त्वाची ठरते; परंतु या रेल्वेच्या बोगीच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे.

सीट्स म्हणजे निव्वळ बेंचराज्यराणी एक्स्प्रेसमधील सीट्स म्हणजे निव्वळ बेंच आहेत. आरामदायी प्रवासच होत नाही. स्वच्छतागृहात पायही ठेवावा वाटत नाही. पेंट्री कारदेखील नाही, असे प्रवाशांनी सांगितले. राज्यराणी एक्स्प्रेसने मुंबईहून परतीचा प्रवास करताना लोकलचे प्रवासी, विनाआरक्षित प्रवासी आरक्षित बोगीत दमदाटी करून मिळेल त्या जागेवर ठिय्या मांडतात. आरक्षित तिकीटधारकाला ‘आमचे रोजचे आहे’, असे म्हणतात. खूप भयंकर अनुभव होता, असे अन्य एका प्रवाशाने ‘लोकमत’ला सांगितले.

सुसज्ज बोगींची गरजराज्यराणी एक्स्प्रेस ही मुंबईला लवकर पोहोचण्यासाठी सोयीची आहे; परंतु बोगींची अवस्था वाईट आहे. याकडे दक्षिण मध्य रेल्वेने लक्ष दिले पाहिजे. एलएचबी कोच जोडल्या पाहिजेत.- अरुण मेघराज, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ

टॅग्स :railwayरेल्वेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर