भीषण आगीत वाळूज एमआयडीसीतील कंपनीचे पेंट शॉप खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 14:42 IST2022-03-02T14:41:51+5:302022-03-02T14:42:51+5:30

जवळपास एक ते दीड कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे

The company's paint shop in Waluj MIDC was burn in the fire | भीषण आगीत वाळूज एमआयडीसीतील कंपनीचे पेंट शॉप खाक

भीषण आगीत वाळूज एमआयडीसीतील कंपनीचे पेंट शॉप खाक

वाळूज ( औरंगाबाद ) : वाळूज उद्योगनगरीतील एलएपीएल ऑटोमोटिव्ह या कंपनीच्या पेंट शॉपला आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत कंपनीचे पेंट शॉप जळून खाक झाले आहे. या आगीत शॉपचे जवळपास १ कोटी रुपयांचे नुकसान नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

एलएपीएल ऑटोमोटिव्ह या वाळूज उद्योगनगरीतील कंपनीत दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांचे इंडिकेटर तयार केले जाते. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास कंपनीच्या पेंट शॉपला अचानक आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य, मशीन्स जळून खाक झाले. 

जवळपास एक ते दीड कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कंपनीचे  सुनील धारपूरकर यांनी व्यक्त केला. कंपनी चे मालक नीरज गोयल हे दिल्ली येथे गेले असून आगीचे कारण समजू शकले नाही
 

Web Title: The company's paint shop in Waluj MIDC was burn in the fire