शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीला सततच्या मारहाणीने भाऊ संतापला; भावोजीचा खून करून मध्यरात्री मृतदेह जाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 16:25 IST

डोंगराच्या पायथ्याशी जाळण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात यश, आरोपी ताब्यात

औरंगाबाद: हिमायतबाग कट्टा परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी शनिवारी मध्यरात्रीनंतर मृतदेह पेटवून देण्याची घटना उघडकीस आली होती. अर्धवट जळालेल्या अवस्थेतील या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून सुधाकर नारायण चिपटे ( 43, रा. सांगले कॉलनी)  असे मृताचे नाव आहे. बहिणीला दारू पिऊन सतत मारहाण करत असल्याने संतापलेल्या भावानेच सुधाकर चिपटे यास संपवल्याचे पुढे आले आहे.  राजेश संतोष मोळवड़े असे आरोपीचे नाव आहे. 

शहरातील एका खाजगी वाहनावर चालक असलेल्या सुधाकर नारायण चिपटे यास दारूचे व्यसन होते. दारू पिऊन सुधाकर आपल्या पत्नीशी वाद घालत मारहाण करत असे. बहिणीला सतत मारहाण होत असल्याने भाऊ राजेश संतोष मोळवडेचा भावोजीवर राग होता. सहा महिन्यापूर्वी राजेश आपल्या कुटुंबासह बहिणीच्या शेजारीच भाड्याच्या घरात राहण्यास आला. दरम्यान, शनिवारी रात्री घरी कोणी नसल्याचे पाहून राजेशने सुधाकर पवार यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. यातच चिपटे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास राजेशने मृतदेह पोत्यात टाकून मोपेडवरून हिमायतबाग कट्टा परिसरात आणला. 

येथे डोंगराच्या पायथ्याशी राजेशने मृतदेहावर डीझेल टाकून पेटवून दिला. त्यानंतर राजेश तेथून पसार झाला. दरम्यान, मोठी आग लागल्याचे दिसल्यामुळे परिसरातील फार्म हाऊसवरील नोकराने जाऊन पाहिल्यानंतर मृतदेह जळताना दिसला. त्याने तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास करत आरोपीचा शोध लावला. 

असा जळाला मृतदेहहत्या करणाऱ्या राजेशने मृतदेह डोंगराच्या पाठीमागील भागातून दुचाकीवर आणला होता. फार्म हाउसच्या समोरच्या भागातून दुचाकी गेलेली नाही. हे जाळलेल्या ठिकाणापासून २०० मीटर अंतरापर्यंत सांडलेल्या रक्तावरून स्पष्ट होत आहे. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास फार्म हाउसवरील बनकर हे लघुशंकेसाठी उठले. तेव्हा त्यांना आग लागल्याचे दिसले. मृतदेहाच्या शरीराचा समोरील भाग चेहरा, हात, छाती, पोट व पाय हे अर्धवट जळाले होते. पाठीमागील बाजूस डोक्यास मोठी जखम असून, पाठीचा व पायाचा मागील भाग पूर्णत: जळालेला होता.

दुचाकी सीसीटीव्हीत कैदलच्छू पहेलवान यांच्या फार्म हाऊसवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक ॲक्टिव्हा मृतदेह घेऊन येताना कैद झाली आहे. मात्र, त्या दुचाकीचा केवळ अर्धा भागच त्यात आला असल्यामुळे पूर्ण दिसत नाही. दुचाकीच्या समोरच्या जागेत पोते ठेवलेले स्पष्ट दिसून येते. मृतदेह प्लास्टिकच्या बॅगमध्ये टाकून त्यावर पांढऱ्या रंगाची गोणी चढवली होती. त्यावरून पोते घातल्याचेही अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसले. त्याशिवाय इतरही भागांतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास करत आरोपीला ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू