शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जमीन व्यावसायिकावर गोळीबार करून हल्लेखोर शेतातील जनावरांच्या गोठ्यात लपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:19 IST

सिडको एमआयडीसी गोळीबार प्रकरण : पाचही आरोपींना अटक

छत्रपती संभाजीनगर : बारच्या पार्किंगमध्ये कारसमोर लघुशंका करण्यावरून झालेल्या वादात जमीन व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत गोळीबार करून पसार झालेल्या योगराज केशव बमणे (२१), सचिन लक्ष्मण परदेशी (२६) व सचिन पंढरीनाथ दुधे (२६, तिघे रा. धनगरगल्ली, हर्सूल) यांना अटक केल्याचे एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले.

कमळापूरचे जमीन व्यावसायिक तौफिक शौफिक पठाण हे दि. २१ सप्टेंबर रोजी रात्री मित्रासह चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील पाम हॉटेल अँड बारमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर रात्री ते बाहेर पडले. त्याचदरम्यान गणेश जनार्दन औताडे (२४) व धीरज संतोष थोरात (२५, दोघे रा. हर्सूल) व पठाण यांच्यात वाद झाले. त्यातून हॉटेलबाहेर औताडेने तौफिक यांच्या कारसमोर लघुशंका केली. त्यातून वाद उफाळून येत दोघांमध्ये हाणामारी झाली. यामुळे गणेश व धीरजने हर्सूलमधील मित्रांना बोलावून घेतले. त्याच्या २० मिनिटांत काही अंतरावर ताैफिक यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ज्यात गोळी निसार यांच्या कानाच्या बाजूने जात दोघे बालंबाल बचावले होते.

चौकशीत मित्रांबाबत कबुलीहल्ल्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिसांनी चार दिवसांपूर्वी गणेश व धिरजला अटक केली. त्यांच्या चौकशीत बारबाहेर वाद झाल्यानंतर त्यांनी सिडको परिसरातच दारू पित बसलेल्या बमणे, परदेशी व दुधेला बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनीच तौफिक यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली.

जनावरांच्या शेतात लपून बसलेनिरीक्षक कल्याणकर यांच्या सूचनेवरून सहायक निरीक्षक भरत पाचोळे, अंमलदार संतोश सोनवणे, संजय नंद, प्रकाश सोनवणे, बाबूराव पांढरे, संतोष गायकवाड, परशुराम सोनुने, अरविंद पुरी यांनी तिघांचा शोध सुरू केला. तिघेही सावंगी परिसरातील एका मठा मागील शेतात जनावरांच्या गोठ्यात मोबाइल बंद करून लपल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पथकाने धाव घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या. शेतात खड्डा करून त्यांनी बंदूक लपवून ठेवली होती. यातील परदेशीवर २०२१ मध्ये एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा, तर दुधेवर २०२३ मध्ये फुलंब्री पाेलिस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Land dealer shot at, assailants hid in cattle shed.

Web Summary : A land dealer was shot after a bar argument. Police arrested three suspects hiding in a cattle shed. The shooting stemmed from a dispute over urination near the victim's car. The suspects have prior criminal records.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर