शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा
2
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले...
3
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
4
उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके
5
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
6
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
7
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
8
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
9
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
10
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
11
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
12
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
13
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
14
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
15
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
16
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
17
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
18
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
19
खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन
20
ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री

प्रशासनाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जमावबंदीचे आदेश

By विकास राऊत | Published: November 01, 2023 1:09 PM

मराठा व धनगर आरक्षणावरून जिल्ह्यात मोर्चे, आंदोलने होत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा प्रशासनाने ग्रामीण पोलिस अधीक्षक हद्दीत १ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदीचे आदेश लागू केले आहेत.

मराठा व धनगर आरक्षणावरून जिल्ह्यात मोर्चे, आंदोलने होत आहेत. या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी सांगितले, लोकांनी एकत्र येण्यास बंधने नाहीत. परंतु सोशल मीडियात समाज हानिकारक एसएमएस टाकणे, दगडफेकीच्या उद्देशाने जमा होणे, शस्त्र, अमली पदार्थ बाळगणाऱ्यांवर कारवाईच्या अनुषंगाने हे आदेश जारी केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी करणे, मोर्चे, आंदोलने करण्यास जिल्ह्यात बंदी असणार आहे.

जिल्ह्यात ६८४ कुणबी जातीच्या नोंदीदरम्यान, जिल्ह्यात कुणबी जातीचा उल्लेख असलेल्या ६८४ नोंदी आढळल्या आहेत. २३ लाख ९ हजार ६६१ अभिलेखांची तपासणी केल्यानंतर या नोंदी आढळल्या. अशी माहिती सूत्रांनी दिली. शासनाच्या अध्यादेशानुसार संबंधितांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. असे सूत्रांनी सांगितले. महसूल अभिलेखात ३३६, शैक्षणिक अभिलेखात २३९, कारागृह अधीक्षक १६, मुद्रांक विभाग, सेवा अभिलेखात प्रत्येकी १, भूमी अभिलेखात ९१ अशा एकूण कुणबी जातीच्या ६८४ नोंदी आढळल्या आहेत. ११ विभागातील ४४ प्रकारची अभिलेखे प्रशासनाने तपासली. यामध्ये महसुली अभिलेखे १५३५३४७, जन्म मृत्यू नोंदी १२५५९, शैक्षणिक अभिलेखे ३५४२११, कारागृह अधीक्षक १४२७०, पोलीस विभाग १५०५६, मुद्रांक विभाग ८९४३६, भूमी अभिलेख २८८०१९, वक्फ बोर्ड ५६५, १९६७ पूर्वीच्या सेवापुस्तिका १९८ अशा एकूण २३ लाख ९ हजार ६६१ अभिलेखे तपासण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद