शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

२०१५ चा फॉर्म्युला अमान्य, फिप्टी-फिप्टी केले तरच शिंदेसेनेसोबत युतीचे सूर जुळतील: अतुल सावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 16:45 IST

पालिका निवडणुकीत भाजपकडे सर्वाधिक जास्त इच्छुक आहेत. त्यामुळे जुन्या सूत्रानुसार जागा वाटप आता शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेसेना २०१५ च्या फॉर्म्युल्यानुसार जागा वाटप करण्याचा मुद्दा पुढे रेटत असून, या निवडणुकीतील जागा वाटपात तो मुद्दा आता मान्य होणार नाही. फिप्टी-फिप्टी जागा वाटप करण्याबाबत एकमत केले तरच युतीचे सूर जुळतील, अन्यथा युतीच्या निर्णयाची सूत्रे प्रदेश कार्यालयाकडे देण्यात येतील. प्रदेश कार्यालयाच्या निर्णयानुसार आम्ही पुढे जाऊ, असे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

पालिका निवडणुकीत भाजपकडे सर्वाधिक जास्त इच्छुक आहेत. त्यामुळे जुन्या सूत्रानुसार जागा वाटप आता शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना गुरूवारी चिकलठाणा येथील मुख्य विभागीय कार्यालयात सुरुवात झाली. मुलाखती घेतल्यानंतर सावे यांनी पत्रकारांशी चर्चा केली.

काय म्हणाले मंत्री सावे...शिवसेना मोठा भाऊ व भाजप धाकटा भाऊ ही २०१५ सालची स्थिती होती. आता तशी परिस्थिती नाही. भाजपची ताकद वाढली आहे. नवीन धोरणानुसार जागा वाटप झाले पाहिजे. २०१५ च्या निवडणुकीत शिवसेनेने जास्त जागा लढल्या होत्या. भाजपने कमी जागा लढल्या होत्या. परंतु, १० वर्षांत भाजपने प्रत्येक वॉर्डात विकासकामे केली. सध्या भाजपमधील इनकमिंग पाहता तुलनेत भाजप खूप पुढे निघून गेला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाचे मॉडेल आणले आहे.

फिप्टी-फिप्टी जागा नाही मिळाल्या तर...फिप्टी-फिप्टी जागा नाही मिळाल्या तर आमच्या प्रदेशाध्यक्षांकडे चर्चा करू. आमची ताकद वाढलेली आहे. मोठ्या भावासारखी आमची स्थिती आहेच. त्यामुळे २०१५ चा जागा वाटपाचा फॉर्म्युला आता चालणार नाही. कमीत कमी ५० टक्केे जागा मिळाव्यात. मित्रपक्ष आरपीआय, राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाला त्यांच्या ताकदीनुसार फिप्टी-फिप्टीतून जागा देऊ.

हा शेवटचा अल्टीमेटम असेल...हा शेवटचा अल्टीमेटम असेल का? यावर सावे म्हणाले, असे नाही. ५० टक्के जागा मिळाल्याच पाहिजेत. आमदार शिंदेसेनेचे जास्त असल्याचे ते सांगत असले तरी आमच्यासह सगळे आमदार, खासदार महायुतीमध्ये निवडून आले आहेत. स्वतंत्र लढण्याच्या तयारीबाबत सावे म्हणाले, स्थानिक पातळीवर आमचे एकमत झाले नाही तर आम्ही प्रदेशाध्यक्षांकडे बाजू मांडू. स्वतंत्र लढणे, आमची निवडणूक तयारी याबाबत प्रदेश पातळीवरून जे आदेश असतील, त्यानुसार निवडणुकीला सामोरे जाऊ.

माझी मुले बॅक ऑफीस सांभाळतील : सावेसध्या भाजपमधील आमदार, खासदार, मंत्र्यांची मुले, बहीण, मुली मनपा निवडणुकीच्या मैदानात येत आहेत. तुमची मुले निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, यावर मंत्री सावे म्हणाले, माझी मुले निवडणुकीची वॉररुम, बॅक ऑफीस सांभाळतील. नेत्यांच्या नातलगांच्या उमेदवारीबाबत सर्वानुमते निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महायुती झाल्यास काय होईल....महायुती झाल्यास बंडखोरीची शक्यता जास्त आहे. नाराज होऊन अनेकजण निवडणुकीला उभे राहतील. ही परिस्थिती सेना-भाजप या दोन्ही पक्षांत आहे. महायुती तुटल्यास सर्वांना संधी मिळणे किमान शक्य होईल का, विरोधकांना रेडिमेड उमेदवार मिळू नयेत, यासाठी महायुतीचे नेते येत्या एक-दोन दिवसांत चर्चा करून निर्णय घेतील. त्यातही फिप्टी-फिप्टी जागेचा अजेंडा प्राधान्य क्रमावर असेल, असे सावे यांनी स्पष्ट केले.

माजी नगरसेवक भाजपमध्ये...ठाकरे गटाचे बेगमपुऱ्याचे माजी नगरसेवक विनायक पांडे यांनी गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश केला. संजय फत्तेलष्कर, नंदकुमार जोशी, विजय सोनटक्के आदींनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. पांडे व त्यांचे समर्थक उमेदवारीसाठी पक्षात आले नाहीत, असे मंत्री सावे यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Equal seat sharing key for Shinde Sena alliance: Atul Save.

Web Summary : Minister Atul Save insists on a 50-50 seat-sharing agreement with Shinde's Sena for the municipal elections, rejecting the 2015 formula. Failure to agree will lead to state-level intervention, with the BJP now stronger and demanding equal representation. RPI and Ajit Pawar faction will be accommodated.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Atul Saveअतुल सावेBJPभाजपाShiv Senaशिवसेना