छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी उद्धवसेनेची मनसे, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसोबत बोलणी झाली आहे. १८ प्रभागांतील जागा वाटपाबाबत आमचे एकमत झाले आहे. उर्वरित ११ प्रभागांसाठी चर्चा सुरू असल्याचे उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी (दि.२३) येथे पत्रकारांना सांगितले.
दानवे म्हणाले की, उद्धवसेनेचे महानगर प्रमुख राजू वैद्य हे दोन दिवसांपर्यंत पक्षांच्या बैठका घेत होते. त्यांनी काँग्रेससोबत जागा वाटपाची बैठक घेतली. मात्र, त्यांनी अचानक भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला, हे समजू शकले नाही. गटबाजीचे त्यांनी दिलेले कारण समर्पक नाही, कारण ते ज्या पक्षात गेले त्या पक्षात गटबाजी नाही का, असा सवाल आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप झाले का, असे विचारले असता ते म्हणाले की, उद्धवसेना आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत आमच्या बैठका झाल्या. मनसे आमच्यासोबत असेल. या बैठकांतून १८ प्रभागांतील सीटबाबत आमचे ठरले आहे. उर्वरित ११ प्रभागांतील सीटसंदर्भात बोलणी सुरू आहे. ही बोलणी पूर्ण होताच आम्ही महाविकास आघाडी जाहीर करू. कोणत्या पक्षाला किती जागा वाट्याला आल्या याविषयी मात्र आजच जाहीर करणे संयुक्तिक नसल्याचे त्यांनी नमूद केले. आमच्या पक्षाचे पदाधिकारी पक्ष सोडत असले, तरी इच्छुकांची संख्या मात्र खूप अधिक आहे. आमच्याकडे सुमारे ३०० जणांनी उमेदवारी मागितली आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने योग्य उमेदवारांची निवड करताना पक्षांतर्गत बंडखोरी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत ‘६१ मशाल’ रॅलीआमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत २६ डिसेंबर रोजी क्रांतीचौक ते गुलमंडी अशी ‘६१ मशाल’ रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत प्रत्येक वॉर्डातून ६१ मशाल घेऊन कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
१० जानेवारी रोजी उद्धव ठाकरेंची सभापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची १० जानेवारी रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होईल, असे दानवे म्हणाले.
Web Summary : Uddhav Sena discusses alliance with MNS, Congress, and VBA for Sambhajinagar elections. Agreement reached on 18 wards, talks ongoing for 11. Aditya Thackeray's rally on December 26, Uddhav Thackeray's meeting on January 10.
Web Summary : उद्धव सेना ने संभाजीनगर चुनावों के लिए मनसे, कांग्रेस और वीबीए के साथ गठबंधन पर चर्चा की। 18 वार्डों पर समझौता हुआ, 11 पर बातचीत जारी। आदित्य ठाकरे की 26 दिसंबर को रैली, उद्धव ठाकरे की 10 जनवरी को सभा।