ठाकरेंच्या लॉकरमध्ये फक्त १३ हजार रुपये!
By Admin | Updated: February 10, 2015 00:33 IST2015-02-10T00:20:32+5:302015-02-10T00:33:23+5:30
औरंगाबाद : पाच लाख रुपयांची लाच घेताना शेगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडलेले गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ऊर्फ शिवाजी अवधूत

ठाकरेंच्या लॉकरमध्ये फक्त १३ हजार रुपये!
औरंगाबाद : पाच लाख रुपयांची लाच घेताना शेगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडलेले गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ऊर्फ शिवाजी अवधूत ठाकरे यांच्या नावे असलेले बँक लॉकर आज पंचांसमक्ष उघडण्यात आले. या लॉकरमध्ये केवळ १३ हजार रुपये आणि ५ ग्रॅम चांदी सापडली.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधीक्षक सुरेश वानखेडे यांनी सांगितले की, रविवारच्या छाप्यात ठाकरे यांच्या निवासस्थानी बँक लॉकरची चावी पोलिसांच्या हाती लागली होती.
सोमवारी सकाळी ठाकरे यांची पत्नी, मुलगी आणि पंचांसह आपण स्वत: आणि उपअधीक्षक संजय लोहकरे, कर्मचारी बँकेत गेले. पंचांसमक्ष बँकेतील ठाकरे यांचे लॉकर उघडण्यात आले. या लॉकरमध्ये केवळ १३ हजार रुपये आणि पाच ग्रॅम चांदी सापडली आहे. पाच लाख रुपये लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या घराच्या झडतीत पोलिसांना काहीच मिळाले नव्हते. त्यामुळे बँक लॉकरमध्ये मोठे घबाड सापडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना त्या लॉकरमध्ये केवळ १३ हजार रुपये रोख आणि ५ ग्रॅम चांदी मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत विविध पदांवरील सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना पकडले. मात्र, ज्या लोकांच्या लॉकरची तपासणी करण्यात आली, त्यापैकी कोणत्याही अधिकाऱ्यांकडे आजच्यापेक्षा नक्कीच जास्त रक्कम आणि अन्य ऐवज सापडला असेल.