शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

माझ्या पाठीशी ठाकरे ब्रॅंड, औरंगाबाद पश्चिममध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढत: राजू शिंदे

By बापू सोळुंके | Updated: November 13, 2024 19:36 IST

गद्दारांना पराभूत करण्यासाठी जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे: राजू शिंदे

छत्रपती संभाजीनगर : पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदार ‘अनिवासी’ आमदाराला कंटाळले आहेत. मागील निवडणुकीत आपण अपक्ष होतो, तरीही जनतेने भरभरून मते दिली. आता ठाकरे ब्रॅंड माझ्या पाठीशी आहे. शिवाय गद्दारांना पराभूत करण्यासाठी जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे, कारण ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे असा, दावा उद्धवसेनेचे उमेदवार राजू शिंदे यांनी केला.

प्रश्न - तुम्ही दोन वेळा या मतदारसंघात पराभूत झालात. आता विजय मिळेल, असे का वाटते?उत्तर - शंभर नाही, एक हजार टक्के मतदार आपल्याला संधी देतील, असा विश्वास आहे. कारण, मागील निवडणुकीत अपक्ष उमेदवार होतो, तरीही ४३ हजार मते मिळाली होती. आता मी मूळ शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आहे. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही माझ्यासोबत आहे. शिवसैनिक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गद्दारांना धडा शिकविण्यासाठी चंग बांधला आहे.

प्रश्न - तुम्ही भाजपमधून येऊन उमेदवारी मिळवली, त्यामुळे उद्धवसेनेतील इच्छुकांची नाराजी भोवणार नाही का?उत्तर - आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही. पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते रात्रंदिवस माझ्यासोबत काम करीत आहेत. शिरसाट यांना चांगला पर्याय मिळाल्याने त्यांच्यात उत्साह संचारला आहे.

प्रश्न - तुम्ही बाहेरचे उमेदवार असल्याचा आरोप होतोय?उत्तर - मी छत्रपती संभाजीनगरचा आहे. मुंबईचा नाही. आमदार शिरसाट यांना मतदारसंघातील दहा लोकांची नावे अचूकपणे सांगून दाखवावी, असे आपले त्यांना आव्हान आहे. कारण, ते ‘अनिवासी’ आहेत. त्यांचा जनतेशी संपर्क तुटलेला आहे.

प्रश्न - लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिंदेसेनेला मताधिक्य मिळाले होते, ते कसे वळविणार?उत्तर - लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा भुमरे साहेबांना लाभ झाला होता. या निवडणुकीत मात्र तसे होणार नाही, कारण आमच्या पक्षाची एकगठ्ठा मते तर मिळणारच आहे. शिवाय, भाजपचा मोठा गट आपल्यासोबत आहे. जरांगे फॅक्टरही आपल्या बाजूने आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची मते आपल्याला मिळतील. यामुळे या निवडणुकीत दीड लाखाहून अधिक मते घेऊन विजयी होऊ.

प्रश्न - आमदार संजय शिरसाट विकास कामांवर मते मागत आहेत, तुम्ही कशावर मागत आहात?उत्तर - शिरसाट यांनी स्वत:चा आणि कुटुंबाचा विकास केला, त्यांनी पंधरा वर्षांत कसला विकास केला? असा माझा त्यांना सवाल आहे, कारण सातारा, देवळाईत आजही ७० टक्के ड्रेनेज आणि रस्ते झाले नाही. नगरनाका ते दौलताबाद रस्ता चौपदरीकरण केला नाही, बजाजनगरात गुन्हेगारी वाढलेली आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिम