शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी फिरविली रबी पीक विम्याकडे पाठ

By admin | Updated: January 6, 2015 01:10 IST

हतनूर : दरवर्षी खरीप, रबी हंगामातील पिकांचा विमा काढूनही पिकांच्या नुकसानभरपाईपोटी विमा मंजूर होत नसल्याने यंदा रबी पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

हतनूर : दरवर्षी खरीप, रबी हंगामातील पिकांचा विमा काढूनही पिकांच्या नुकसानभरपाईपोटी विमा मंजूर होत नसल्याने यंदा रबी पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. दुष्काळी परिस्थितीत पीक विम्यासंबंधी शेतकऱ्यांत वेळीच जनजागृती न केल्याने रबी पीक उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.खरीप हंगामातील कापूस, मका, बाजरी या पिकांचा जवळपास दोन हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. शेतकरी दुष्काळात होरपळत असतानाही पीक विम्यासंदर्भात काहीच हालचाल दिसत नाहीत. पीक विमा मंजूर होण्याची काहीच चिन्हे दिसत नसल्याने शेतकऱ्यांचा याबाबत निराशाजनक सूर आहे. पीक विमा मंजूर होऊन नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या पदरात पडेल की नाही, याविषयी साशंकता दिसत असल्याने शेतकऱ्यांचा खरीप पीक विमा भरण्यास निरुत्साह दिसून आला. पर्जन्यमान कमी, ५० पैशांच्या आत आणेवारी, घटलेले उत्पन्न या सर्व बाबी पीक विमा मंजूर होण्यासाठी अनुकूल असताना पीक विमा मंजूर होत नाही, हे एक कोडेच आहे.२०१२ या वर्षीसुद्धा आणेवारी कमी असताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रबी पिकांचा विमा भरला होता; तोही मंजूर न झाल्याने विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या हातात छदामही टेकवला नाही. यंदाही आठ लाख रुपये विम्यापोटी विमा कंपनीने गिळून टाकले, तरीही या वर्षीच्या खरीप व २०१२ च्या रबी पीक विम्याचे काय झाले, याबाबत शेतकऱ्यांना कुणीच मार्गदर्शन करीत नाही.कृषी विभागाने ३१ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत गहू, ज्वारी, हरभरा यासह इतर पिकांचा विमा भरण्याचे आवाहन केले होते; मात्र योजनेच्या अंतिम दिवसापर्यंत हतनूर शाखेअंतर्गत येणाऱ्या ८ ते १० खेड्यांतील एकाही शेतकऱ्याने पीक विमा योजनेत भाग घेतला नाही. कन्नड मंडळांतर्गत नव्हे, तर जिल्ह्यात सर्वांत जास्त म्हणजेच ३ हजार २५० हेक्टर क्षेत्र असलेले शिवार आहे. रबीचा पेराही मोठ्या प्रमाणात आहे. गल्लाभरू विमा कंपनीच्या धोरणामुळे एकाही शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थितीतही रबी पीक विमा भरला नाही. पीक विम्याचे या पिकासाठी इतके पैसे भरा, याव्यतिरिक्त मंजूर होण्याचे निकष काय आहे, याबाबतीत कृषी विभागाच अनभिज्ञ आहे.