पीकविम्याकडे पाठ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:09 IST2017-08-10T00:09:05+5:302017-08-10T00:09:05+5:30
नुकसानभरपाई मिळत नसल्याने व मिळालीच तर अशा शेतकºयांची संख्या कमी असल्याने यंदा पीकविमा भरण्यास शेतकरी उदासीन असल्याचे दिसून आले

पीकविम्याकडे पाठ...
स.सो. खंडाळकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नुकसानभरपाई मिळत नसल्याने व मिळालीच तर अशा शेतकºयांची संख्या कमी असल्याने यंदा पीकविमा भरण्यास शेतकरी उदासीन असल्याचे दिसून आले. त्यामुळेच गतवर्षी ६ लाख ४३ हजार शेतकºयांनी पीकविमा भरला असताना यंदा मात्र अवघ्या १ लाख २८ हजार ९१० शेतकºयांनी पीकविमा भरण्यात रुची दाखवली. जिल्हा बँकेकडे यंदा फक्त १२ कोटी ३२ लाख रुपयेच भरण्यात आले. गतवर्षी हा आकडा २४ कोटींचा होता.
१० आॅगस्टपर्यंत पीकविमा भरण्याची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी पुन्हा करण्यात आली होती. मात्र, ती एकदाच ३१ जुलैनंतर ५ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली. शेतकºयांनी पीकविमा आॅनलाइन भरावा, असे अपेक्षित होते. मात्र, राष्टÑीयीकृत बँकांचे सॉफ्टवेअर बंद पडल्याने शेतकºयांची अडचण झाली. राष्टÑीयीकृत बँका हा पीकविमा भरून घेण्यास उत्सुक नसल्याची चर्चाही आता ऐकावयास मिळत आहे. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १३८ शाखांमधून आॅफलाइन का होईना पीकविमा भरून घेण्यात आला.
गतवर्षी ६ लाख ४३ हजार शेतकºयांनी २४ कोटींचा पीकविमा भरला असतानाही फक्त ४७ हजार शेतकºयांना ७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळाली. त्याच्या आधीच्या वर्षीही नुकसानभरपाई ६३ कोटी रुपयांची देण्यात आली होती. नुकसानभरपाई कमी मिळू लागल्यामुळेच यंदा शेतकºयांनी पीकविमा भरण्याकडे पाठ फिरवली असल्याचे बोलले जात आहे. राज्य सहकारी ग्रामीण बँकेकडे काही शेतकºयांनी पीकविमा भरला. बाकीच्या बँकांमध्ये पीकविमा भरून घेतला गेला नाही, अशी माहिती मिळाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सोयाबीनचे पीक नाही. मका जास्त आहे. हिंगोली जिल्ह्यात मूग, उडदाचे पीक जास्त घेतले जाते. नांदेड जिल्ह्यात सोयाबीन व तुरीचे उत्पादन जास्त होते. पीकपेरा आणि नुकसानभरपाईत आलेले पीक यावर रक्कम मिळत असते. ५० पैसे आणेवारीची तर अट आहेच.