टीईटी परीक्षा सुरळीत
By Admin | Updated: January 16, 2016 23:24 IST2016-01-16T23:23:13+5:302016-01-16T23:24:45+5:30
परभणी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा शनिवारी सुरळीत पार पडली. या परीक्षेमध्ये दोन्ही सत्रांतील मिळून ९ हजार ४०४ भावी शिक्षकांपैकी ५९६ भावी शिक्षक गैरहजर राहिले.

टीईटी परीक्षा सुरळीत
परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीेने घेण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा शनिवारी सुरळीत पार पडली. या परीक्षेमध्ये दोन्ही सत्रांतील मिळून ९ हजार ४०४ भावी शिक्षकांपैकी ५९६ भावी शिक्षक गैरहजर राहिले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा शनिवारी पार पडली. सकाळी १०.३० ते १ दरम्यान प्रथम सत्रासाठी तर दुपारी २ ते ४.३० दरम्यान द्वितीय सत्रासाठी परीक्षा घेण्यात आली. प्रथम सत्रासाठी जिल्ह्यातून ५ हजार ४७६ जणांनी टीईटीसाठी आवेदनपत्र सादर केले होते. तर द्वितीय सत्रासाठी ३ हजार ९२८ जणांनी अर्ज सादर केले होते. शनिवारी झालेल्या परीक्षेसाठी प्रथम सत्रातील ५ हजार ४७६ पैकी ५ हजार १३२ जणांनी परीक्षा दिली. तर ३४४ जण या परीक्षेसाठी अनुपस्थित राहिले. दुपारी झालेल्या परीक्षेसाठी ३ हजार ९२८ पैकी ३ हजार ६७६ जण परीक्षेला उपस्थित होते. तर २५२ जणांनी या परीक्षेकडे पाठ फिरविली. सकाळच्या सत्रासाठी १९ केंद्रांवर तर दुपारच्या सत्रासाठी १४ केंद्रावर परीक्षा घेण्यात आल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी नासेर खान यांनी दिली. (प्रतिनिधी)