शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

वेरूळ लेणीजवळ भीषण अपघात; दोन ट्रकच्या धडकेनंतर बॉयलरखाली दबून सासू-जावयाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 19:57 IST

जड वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली, दोन निष्पाप जीवांचा बळी

खुलताबाद: जगप्रसिद्ध वेरूळ लेणीजवळ घाटात आयशर ट्रक व 16 टायर ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात आयशर ट्रकवरील बॉयलर बेल्ट तुटून रस्त्यावर कोसळला. याचवेळी तेथून जाणारे दुचाकीस्वार बॉयलरखाली आली. यात दुचाकीवरील सासू आणि जावई यांचा करुण अंत झाल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, वेरूळ येथील रहिवासी कचरू सांडू त्रिभुवन (वय 42) हे सासू चंद्रभागाबाई आसाराम भालेराव ( वय 65) यांच्यासह दुचाकीवरून (MH 20 GP 1404) राजीवगांधी नगर येथून खुलताबाद येथे जात होते. तेवढ्यात कन्नडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा आयशर ट्रक(MH 42 AQ 9646) व खुलताबादहून कन्नडकडे जाणारा 16 टायर ट्रक क्र.(MH 40 CQ 7355) यात समोरासमोर धडक झाली. भीषण धडकेत आयशर ट्रकवरील औद्योगिक वापरासाठीचा बॉयलर बेल्ट तुटून रस्त्यावर कोसळला. यावेळी दुचाकीवरील कचरू सांडू त्रिभुवन व त्यांच्या सासुबाई चंद्रभागाबाई भालेराव बॉयलर खाली येऊन गंभीर जखमी झाले. सामाजिक कार्यकर्ते शेख मस्सीउद्दीन,पोहेकॉ प्रमोद साळवी व इतरांनी जखमींना खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठीची तयारी सुरू आहे. दरम्यान, बॉयलर कोसळल्याने एका चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या अपघाताने घटमधील वाहतूक ठप्प झाली होती.

पोलीस प्रशासनाचे  दुर्लक्षविशेष म्हणजे वेरूळ येथील लेणी क्रमांक 16 समोर बुधवारी मध्य रात्रीच चोरट्यांनी एटीएमसह त्यातील रक्कम चोरून नेली आहे. या कामी तेथे अनेक पोलीस कर्मचारी हे तपासणीसाठी जपते. त्यांच्या समोरून आयशर ट्रक बॉयलर घेऊन पुढे गेला. तरी देखील त्यांनी रोखले नाही. शिवाय खुलताबाद येथे देखील उरूस सुरू आहे. त्या परिसरात अपघात झाला असता तर मोठी जीवितहानी घडली असती.

जड वाहतुकीसाठी घाटरस्ता बंद वेरूळ येथील भोसले चौक ते दौलताबाद टी पॉइंट पर्यंत रस्ता हा जड वाहतुकीसाठी बंद आहे. त्यात खुलताबाद येथे उरूस सुरू आहे.  अनेक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. मात्र असे असून देखील ट्रक या रस्त्यावर कसा आला? याबाबत दोषींवर कारवाई करावी.- सतीश देवेंद्र लोखंडे, वेरूळ, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात