शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! पाडळी शिवारात ४० वर्षीय व्यक्तीचे फक्त धड सापडले, मुंडके गायब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 19:32 IST

आज दिवसभर पोलिसांनी मृताचे शिर शोधले; परंतु ते सापडले नाही.

बिडकीन (औरंगाबाद) : पैठण तालुक्यातील पाडळी येथील एका ४० वर्षीय व्यक्तीचा गुरूवारी खून झाला असून शुक्रवारी त्याचे शरीर पोलिसांना गाव शिवारातील एका शेतात सापडले; परंतु शिर सापडले नसल्याचे दिवसभर पोलिसांनी याचा शोध घेतला. मात्र त्यांच्या हाती निराशाच आली.

पाडळी येथील संदीप संपत गायकवाड हा व्यक्ती गुरूवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर निघून गेला होता. शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्याचे शिर नसलेले शरीर गाव शिवारातील एका गायरान शेतामध्ये काही शेतकऱ्यांना आढळले. याबाबत बिडकीन पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर सपोनि संतोष माने, उपनि जगदीश मोरे, महेश घुगे, बीट जमादार संजीवन कदम, शरद पवार, सचिन म्हस्के आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ठसे तज्ज्ञ, श्वान पथकास पाचारण करण्यात आले. काही वेळानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहुल, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, उपनिरीक्षक रामा जाधव, वाल्मीक निकम, खांदेभराड आदी दाखल झाले. 

शुक्रवारी दिवसभर पोलिसांनी मयताचे शिर शोधले; परंतु ते सापडले नाही. यावेळी पोलीस मयताचे शरीर ग्रामीण रूग्णालयात आणत असताना त्यास मयताच्या नातेवाईकांनी विरोध केला. आगोदर आरोपींना अटक करा, मगच मृतदेह उचला असा आक्रमक पवित्रा घेतला. पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मृतदेह बिडकीन ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. रात्री उशिरा मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

मयतावर विविध गुन्हेमयत संदीप गायकवाड हा परिवारासह पाडळी येथे राहत होता. त्याला १६ वर्षाचा एक मुलगा व एक लहान मुलगा आहे. मात्र सद्यस्थितीत तो पत्नीसोबत राहत नसल्याचे समजते. त्याच्यावर यापूर्वी पोलीस ठाण्यात मारहाण, विनयभंग असे गुन्हे दाखल असून पूर्व वैमान्यासातून ही घटना घडली असावी, असा आरोप नातेवाईक करीत आहेत. पाडळी येथे दंगा नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले आहे.

एका संशयितास घेतले ताब्यातदरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी एका संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे समजते. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू