नांदेड : शहरातील भाग्यनगर परिसरात दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर परिसरात तणाव पसरला होता़ ही घटना बुधवारी रात्री घडली़भाग्यनगर परिसरात दोन गटांत किरकोळ कारणावरुन हाणामारी झाली़ यावेळी दोन्ही गटांतील काही लोक जखमी झाले़ त्यामुळे परिसरात तणाव पसरला होता़ पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली़ परंतु तोपर्यंत हाणामारी करणारे पसार झाले होते़ दरम्यान, या प्रकारामुळे या भागातील विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद केली होती़ या प्रकरणात भाग्यनगर पोलिस ठाण्यात मात्र रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती़ परंतु परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ खबरदारी म्हणून नाकाबंदी सुरु होती़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}