भाडेकरूने घोटला तीन वर्षांच्या मुलाचा गळा
By Admin | Updated: July 15, 2014 01:02 IST2014-07-15T00:43:01+5:302014-07-15T01:02:49+5:30
औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरातील राजनगरात नराधाम भाडेकरूनेच घरमालकाच्या तीन वर्षीय मुलाचा गळा दाबून खून केला. हा धक्कादायक प्रकार मध्यरात्री उघडकीस आला.

भाडेकरूने घोटला तीन वर्षांच्या मुलाचा गळा
औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरातील राजनगरात नराधाम भाडेकरूनेच घरमालकाच्या तीन वर्षीय मुलाचा गळा दाबून खून केला. हा धक्कादायक प्रकार मध्यरात्री उघडकीस आला.
सागर सुदाम कांबळे (३), असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. आरोपी रितेश अभय नाडे (२४, रा. राजनगर) याला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नराधम आरोपीने या बालकावर लैंगिक अत्याचार करून नंतर हा खून केला असावा, असा पोलिसांना संशय आहे.
रितेश म्हणतो.. ‘डोके फिरलेय म्हणून’
1अटकेनंतर पोलिसांनी रितेशला ‘खाक्या’ दाखविताच त्याने ‘साहेब मला आई- वडील सोडून गेले. मला कुणीच नाही. त्यामुळे माझे डोके फिरलेय. करून टाकला खून,’ अशा शब्दांत त्याने खुनाची कबुली दिली. खून करण्याचे कारण काय? असे विचारले असता ‘काहीच नाही, उगीच खून केला’, असे तो म्हणाला.
2 रितेश हा मूळचा लासूर स्टेशनचा आहे. तो अविवाहित आहे. त्याचे आई- वडील गावाकडे राहतात. त्याच्या विचित्र वागणुकीमुळे त्याला घरचे जवळ करीत नाहीत, असे तपासात समोर आले आहे. रितेश मजुरी करायचा. त्यातूनच त्याची मयत सागरचे वडील सुदाम कांबळे यांच्याशी मैत्री झाली होती. कांबळे यांनी आपलीच एक पत्र्याच्या शेडची खोली रितेशला भाड्याने दिली होती.
स्वत:च दिली ‘टीप’
1खून केल्यानंतर सायंकाळी आरोपी रितेश हा नशेत होता. सुदाम कांबळे यांच्यासोबत सागरचा शोध घेत फिरत असताना रात्री सागर विषयी चर्चा सुरू होती. तेव्हा नशेत असलेल्या रितेशने ‘त्याला तर मीच मारले’ असे उत्तर दिले आणि धूम ठोकली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पोलीस ठाण्यात आणले प्रेत
1शवविच्छेदनानंतर कांबळे कुटुंब आणि राजनगरातील संतप्त नागरिकांनी दुपारी ३ वाजता प्रेत सरळ मुकुंदवाडी ठाण्यात आणले. नराधम आरोपी रितेशला आमच्या स्वाधीन करा, त्याला आम्हीच शिक्षा देणार, अशी मागणी या जमावाने केली. जमाव प्रचंड आक्रमक होता. सुमारे पाऊण तास जमाव ठाण्यासमोरच उभा होता.
2 शेवटी फौजदार सुनील बागूल यांनी या जमावाची समजूत घातली. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्याला कठोर शिक्षा होईल, असे आश्वासन दिले. तेव्हा नातेवाईकांनी सागरचे प्रेत ठाण्यासमोरून हलविले.